अभिनेते सयाजी शिंदेंनी घेतली जरांगे-पाटलांची भेट
वडीगोद्री, Bharat Live News Media वृत्तसेवा : प्रसिध्द अभिनेते सयाजी शिंदे यांनी आज (दि.३) अंतरवाली सराटी येथे मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे- पाटील यांची भेट घेतली. व मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या जरांगे- पाटलांना आपला पाठिंबा असल्याचे यावेळी स्पष्ट केले. (Maratha Arkshan)
यावेळी पत्रकारांशी बोलताना अभिनेते शिंदे म्हणाले, आरक्षणाच्या मागणीला माझा पाठिंबा आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळायला पाहिजे. कोणीतरी आवाज उठवणे गरजेचे होते. आणि तो आवाज मनोज जरांगे- पाटील यांनी उठवला आहे. त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मी अंतरवाली सराटीत आलो आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरून नाही पण आमचा त्यांना पाठिंबा राहणार, अशी स्पष्ट भूमिका सयाजी शिंदे यांनी व्यक्त केली.(Maratha Arkshan)
मनोज जरांगे पाटील यांच्यासारख्या व्यक्तीने ‘न भूतो न भविष्यती’ असे अद्वितीय कार्य केले. त्यामुळे त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मी ही भेट घेतली आहे. माझ्यात आणि जरांगे पाटील यांच्यात काही चर्चा झालेली नाही. कारण मी काही अभ्यासक नाही. मी फक्त इथे आलो, त्यांना भेटलो आणि चहापाणी घेतले, असे त्यांनी स्पष्ट केले.
मुंबईत होणाऱ्या आंदोलनात सहभागी होणार का? यावर ते म्हणाले, प्रत्येकाने रस्त्यावर उतरून ओरडले पाहिजे, असे नाही. पण त्या मोर्चाला पाठिंबा असणं महत्त्वाचं असतं. सत्याच्या बाजूने लोक नेहमीच उभे राहतात. राज्यभरात ५४ लाख मराठा कुणबी नोंदी सापडल्या आहेत. त्यामुळे सध्या सर्वांचीच परीक्षा सुरू आहे. जरांगे- पाटील या परीक्षेत उत्तम आहेत. त्यामुळे राजकारण्यांचीही परीक्षा सुरू आहे. मराठा समाजातील विद्यार्थी आणि तरुणांचा विचार केला पाहिजे, असेही अभिनेते शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केले.(Maratha Arkshan)
हेही वाचा :
Manoj Jarange-Patil | …तर मुंबईचा दूध, धान्य, भाजीपाला बंद करू : मनोज जरांगे- पाटील
Maratha Reservation : जरांगे-पाटील मराठा आंदोलकांसह अयोध्येला जाणार
Maratha Reservation : मला अडवलं तर फडणवीसांच्या घरासमोर बसू : मनोज जरांगे पाटील
Latest Marathi News अभिनेते सयाजी शिंदेंनी घेतली जरांगे-पाटलांची भेट Brought to You By : Bharat Live News Media.