सना खान खूनप्रकरण: अमित साहू याच्या घरातून मोबाईल, लॅपटॉप जप्त

नागपूर: पुढारी वृत्तसेवा : भाजपच्या अल्पसंख्याक आघाडीच्या पदाधिकारी सना खान यांच्या खून प्रकरणात मुख्य आरोपी अमित साहू याच्या घरुन पोलिसांना अखेर एक मोबाईल फोन व लॅपटॉप जप्त करण्यात यश आले आहे. Sana Khan Murder Case आरोपी अमित साहूच्या आईच्या घरातून हे मोबाईल आणि लॅपटॉप जप्त करण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी मुख्य आरोपी अमित … The post सना खान खूनप्रकरण: अमित साहू याच्या घरातून मोबाईल, लॅपटॉप जप्त appeared first on पुढारी.

सना खान खूनप्रकरण: अमित साहू याच्या घरातून मोबाईल, लॅपटॉप जप्त

नागपूर: Bharat Live News Media वृत्तसेवा : भाजपच्या अल्पसंख्याक आघाडीच्या पदाधिकारी सना खान यांच्या खून प्रकरणात मुख्य आरोपी अमित साहू याच्या घरुन पोलिसांना अखेर एक मोबाईल फोन व लॅपटॉप जप्त करण्यात यश आले आहे. Sana Khan Murder Case
आरोपी अमित साहूच्या आईच्या घरातून हे मोबाईल आणि लॅपटॉप जप्त करण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी मुख्य आरोपी अमित साहूची ‘पोलिग्राफ टेस्ट’ आणि ‘लाय डिटेक्टर टेस्ट’ करण्याचे ठरवले असून त्यासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू केली आहे. भाजप पदाधिकारी सना खान काही महिन्यांपूर्वी मध्य प्रदेशातील जबलपूरला अमित शाहूने बोलावल्यानंतर बेपत्ता झाल्या होत्या. त्यानंतर अमित साहू त्यांच्या जिवलग मित्राने किंबहुना पतीनेच त्यांची हत्या केल्याचे समोर आले होते. Sana Khan Murder Case
मात्र, आजवर सना खान यांचा मृतदेह पोलिसांच्या हाती लागलेला नाही. यासोबतच अनेक रहस्य दडलेला असल्याचे सांगण्यात येत असलेला सना खान यांचा मोबाईल फोनही पोलिसांना मिळालेला नव्हता. अर्थातच आता उशिरा का होईना हा मोबाईल पोलिस तपासात कितपत उपयोगी पडणार याविषयीची उत्सुकता सनाच्या कुटुंबियांसह सर्वांना लागली आहे. मध्यंतरी हिवाळी अधिवेशन काळात सनाच्या आईने भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे न्यायासाठी साकडे घातले होते हे विशेष.
हेही वाचा 

School Van Drivers Strike : नागपूरमध्ये स्कूल व्हॅन चालकांचा एक दिवसीय संप
नागपूर : नव्या हिट अँड रन कायद्याविरोधात वाहन चालक आक्रमक
नागपूर : पत्नीने केला दारूड्या पतीचा खून

Latest Marathi News सना खान खूनप्रकरण: अमित साहू याच्या घरातून मोबाईल, लॅपटॉप जप्त Brought to You By : Bharat Live News Media.