भारताला चौथा धक्का, श्रेयस अय्यर शून्यावर बाद

पुढारी ऑनलाईन डेस्क : IND vs SA 2nd Test : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरी कसोटी केपटाऊनच्या न्यूलँड्स मैदानावर खेळली जात आहे. दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. भारताने दमदार गोलंदाजी करत यजमान संघाला स्वस्तात बाद केले. दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव उपाहारापूर्वी 23.2 षटकांत 55 धावांत आटोपला. भारताविरुद्धच्या कसोटीतील कोणत्याही संघाची ही सर्वात … The post भारताला चौथा धक्का, श्रेयस अय्यर शून्यावर बाद appeared first on पुढारी.

भारताला चौथा धक्का, श्रेयस अय्यर शून्यावर बाद

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : IND vs SA 2nd Test : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरी कसोटी केपटाऊनच्या न्यूलँड्स मैदानावर खेळली जात आहे. दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. भारताने दमदार गोलंदाजी करत यजमान संघाला स्वस्तात बाद केले. दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव उपाहारापूर्वी 23.2 षटकांत 55 धावांत आटोपला. भारताविरुद्धच्या कसोटीतील कोणत्याही संघाची ही सर्वात निच्चांकी धावसंख्या आहे. वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने 9 षटकात 15 धावा देत 6 बळी घेतले. जसप्रीत बुमराह आणि मुकेश कुमार यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. द. आफ्रिकेकडून काईल वेरेनेने सर्वाधिक 15 धावा केल्या. डेव्हिड बेडिंगहॅमने 12 धावांचे योगदान दिले. यानंतर आपला पहिला डाव खेळण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. तिसर्‍याच षटकात यशस्वी जैस्वाल खाते न उघडता बोल्ड झाला. त्यानंतर रोहित शर्मा 15 व्या षटकात 39 धावा काढून पॅव्हेलियनमध्ये परतला. सध्या शुभमन गिल आणि विराट कोहली फलंदाजी करत आहेत. भारताची धावसंख्या 23 षटकात 2 बाद 110 पर्यंत पोहचली आहे. यासह टीम इंडियाने 55 धावांची आघाडी घेतली आहे.
श्रेयस खाते न उघडताच बाद
श्रेयस अय्यर खाते न उघडताच बाद झाला. त्याने फक्त दोन चेंडूंचा सामना केला. नांद्रे बर्जरने त्याला यष्टिरक्षक वेरेनेकरवी झेलबाद केले.
भारताची तिसरी विकेट
भारताची तिसरी विकेट 105 धावांवर पडली. शुभमन गिल 36 धावा करून बाद झाला. नांद्रे बर्जरने त्याला मार्को जॅनसेनकरवी झेलबाद केले.
भारताची दुसरी विकेट
भारताची दुसरी विकेट 72 धावांवर पडली. कर्णधार रोहित शर्मा 39 धावा करून बाद झाला. नांद्रे बर्जरने त्याला मार्को जॅनसेनकरवी झेलबाद केले.
भारताची पहिल्या डावात आघाडी (IND vs SA 2nd Test)
भारतीय संघाने पहिल्या डावात आघाडी घेतली आहे. रोहित शर्माने वेगवान धावा केल्या आणि भारतीय संघाला चांगल्या स्थितीत आणले. यादरम्यान त्याने शुभमन गिल सोबत अर्धशतकी भागीदारी रचली. यासह भारतीय संघाला पहिल्या डावात मोठी आघाडी घेण्याची संधी आहे.
यशस्वी शुन्यावर बाद
दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात यशस्वी जैस्वालची बॅट चालली नाही. तो खाते न उघडताच बाद झाला. त्याने सात चेंडूंचा सामना केला. त्याला कागिसो रबाडाने क्लीन बोल्ड केले.
द. आफ्रिका 55 धावांत गारद
यजमान दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव 55 धावांवर गारद झाला. पहिल्या कसोटी सामन्यात निराशाजनक कामगिरी करणाऱ्या भारतीय गोलंदाजांनी केपटाऊन कसोटीत अप्रतिम मारा केला. मोहम्मद सिराजने सर्वाधिक सहा बळी घेतले. जसप्रीत बुमराह आणि मुकेश कुमार यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. दक्षिण आफ्रिकेचे दोनच फलंदाज दुहेरी आकडा गाठू शकले. काइल वेरनेने 15 आणि डेव्हिड बेडिंगहॅमने 12 धावांचे योगदान दिले. याशिवाय एकाही फलंदाजाला दुहेरी आकडा गाठता आला नाही. एडन मार्कराम (2), डीन एल्गर (4), टोनी डी जॉर्जी (2), ट्रिस्टन स्टब्स (3), मार्को जॅनसेन (0), केशव महाराज (1), कागिसो रबाडा (2), नांद्रे बर्जर (4) हे आले तसे तंबूत परतले.
Latest Marathi News भारताला चौथा धक्का, श्रेयस अय्यर शून्यावर बाद Brought to You By : Bharat Live News Media.