Crime News : निपाणी जळगावात आढळला मानवी हाताचा पंजा अन् हाड

पाथर्डीतालुका : पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील निपाणी जळगाव शिवारात अज्ञात इसमाच्या हाताचा पंजा व एक हाड सापडले आहे. सहायक पोलिस निरीक्षक रामेश्वर कायंदे यांनी पोलिस पथकासह घटनास्थळी दाखल होत, हाताचा पंजा व हाड ताब्यात घेऊन, वैद्यकीय तपासणीसाठी पाठविले आहेत. त्यानंतरच या गुन्ह्याचा उलगडा होणार आहे. चंपा भोसले हे निपाणी जळगाव शिवारातील राहत्या घरून मंगळवारी (दि.2) सकाळी … The post Crime News : निपाणी जळगावात आढळला मानवी हाताचा पंजा अन् हाड appeared first on पुढारी.

Crime News : निपाणी जळगावात आढळला मानवी हाताचा पंजा अन् हाड

पाथर्डीतालुका : Bharat Live News Media वृत्तसेवा : तालुक्यातील निपाणी जळगाव शिवारात अज्ञात इसमाच्या हाताचा पंजा व एक हाड सापडले आहे. सहायक पोलिस निरीक्षक रामेश्वर कायंदे यांनी पोलिस पथकासह घटनास्थळी दाखल होत, हाताचा पंजा व हाड ताब्यात घेऊन, वैद्यकीय तपासणीसाठी पाठविले आहेत. त्यानंतरच या गुन्ह्याचा उलगडा होणार आहे.
चंपा भोसले हे निपाणी जळगाव शिवारातील राहत्या घरून मंगळवारी (दि.2) सकाळी 9 च्या सुमारास पाथर्डीकडे येत होते. यावेळी त्यांना त्यांच्या शेतात रस्त्याच्या कडेला एक मानवी शरीराचा हाताचा पंजा व एक हाड पडलेले दिसले. त्यांनी जवळ जाऊन पाहिले असता हे अवयव मानवी शरीराचे असल्याचे दिसले. त्यांनी तत्काळ पाथर्डी पोलिसांना माहिती दिली.
पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत आजूबाजूला पाहणी करून या मानवी शरीराचे अजून काही भाग या परिसरात आहे का? याचा शोध घेतला. त्याचप्रमाणे नेमके हे शरीराचे अवयव कुठून व कसे आले? याचा तपास पोलिस करीत आहे. याप्रकरणी पाथर्डी पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक श्रीकांत डांगे करीत आहेत.
हेही वाचा 

Ayodhya Ram Mandir : राम मंदिर उद्घाटन सोहळ्याचे अमेरिकेतील मंदिरांमध्ये थेट प्रक्षेपण
Raghav-Parineeti : न्यू ईअरचं सेलिब्रेशन रोमँटिक अंदाजात, राघव-परिणीतीचे फोटो पाहा
Abortion | धक्कादायक : १२ वर्षाच्या मुलीचे अल्पवयीन भावासोबत संबंध; न्यायालयाने गर्भपाताची याचिका फेटाळली

Latest Marathi News Crime News : निपाणी जळगावात आढळला मानवी हाताचा पंजा अन् हाड Brought to You By : Bharat Live News Media.