धक्कादायक: आटपाडीतील तीन अल्पवयीन मुलींवर लाॅजवर बलात्कार
आटपाडी, Bharat Live News Media वृत्तसेवा : आटपाडी तालुक्यातील एका गावातील तीन अल्पवयीन मुलींना एकाच दिवशी फिरायला जाण्याचे आमिष दाखवून लॉजवर नेऊन बलात्कार केल्याची धक्कादायक आणि संतापजनक घटना घडली आहे. याबाबत पीडित मुलींनी आटपाडी पोलिसांत फिर्याद दिली आहे. Sangli News
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, संशयितांना पीडिता अल्पवयीन असल्याचे माहीत होते. तरी देखील ते या मुलीचा वारंवार पाठलाग करत होते. २७ डिसेंबररोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास पीडितांना फिरायला जाऊ, असे सांगून त्यांना आटपाडी येथील कल्लेश्वर मंदिराजवळ बोलवून घेतले. व तेथून कौठुळी रस्त्यावरील तृप्ती लॉजवर नेऊन त्यांच्यावर बलात्कार केला. Sangli News
याप्रकरणी पांडुरंग हनुमंत यमगर (रा.बनपुरी ता. आटपाडी), सुभाष यमगर (रा.बनपुरी ता.आटपाडी), किरण बाळासो शेंडगे (रा.शेंडगेवाडी ता. आटपाडी) यांच्यावर पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तीन आरोपी आणि लॉज व्यवस्थापक रिंकू सुरेश यादव अशा चौघांना अटक करण्यात आली आहे. चारही आरोपींना आज (दि.३) न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना सहा तारखेपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय कोळेकर करत आहेत.
हेही वाचा
सांगली : म्हैसाळचे पाणी बंद करण्यास विरोध केल्याने तीन शेतकऱ्यांवर गुन्हा
सांगली : खंडनाळ येथील मजुराचा संशयास्पद मृत्यू
सांगली : ‘सोनहिरा’ कारखान्याकडून ३,१७५ रुपये पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा : मोहनराव कदम
Latest Marathi News धक्कादायक: आटपाडीतील तीन अल्पवयीन मुलींवर लाॅजवर बलात्कार Brought to You By : Bharat Live News Media.