इकडं अरबाजनं शूराला केलं प्रपोज तर तिकडं मुलगा राशाला करतोय डेट?
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : निर्माता आणि बॉलिवूड अभिनेता अरबाज खानने गेल्या काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री शूरा खानशी मोजक्याच नातेवाईकांच्यात उपस्थितीत विवाह केला. या विवाहाच्या आधीपासून अरबाज खान सोशल मिडियावर चर्चेत आला होता. यानंतर अरबाजनं गुडघ्यावर बसून शूरा खानला प्रपोज केल्याने पुन्हा चर्चाचा विषय बनला. आता दोघेजण क्यूट कपल विवाहानंतरचे आनंदाचे क्षण एन्जॉय करत आहेत. तर दुसरीकडे अरबाजचा मुलगा अरहान खान बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडनची मुलगी राशा थंडानीला डेट करत असल्याची चर्चा रंगू लागली आहे. या दोन्ही घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहेत. ( Arbaaz-Arhaan Khan )
संबंधित बातम्या
Raghav-Parineeti : न्यू ईअरचं सेलिब्रेशन रोमँटिक अंदाजात, राघव-परिणीतीचे फोटो पाहा
Khushi Kapoor : श्रीदेवीची लेक खुशीही पडली प्रेमात?
Madhuri Dixit : माधुरीने कुटुंबासह सिद्धिविनायकाच्या दर्शनाला, फॅन्सची उसळली गर्दी
अभिनेता अरबाज खान आणि अभिनेत्री शूरा खानचा २४ डिसेंबर २०२३ रोजी बहीण अर्पिता खान हिच्या घरी मोठ्या उत्साहात विवाह सोळळा संपन्न झाला. दरम्यान या लग्नाआधीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत अरबाज खान हा रोमॅंटिक मूडमध्ये असून गुडघ्यावर बसून शूरा खानला लग्नासाठी प्रपोज करताना दिसतोय. यावेळी अरबाजच्या हातात मोठा फुलांचा बुके असून खान कुटुंबियही उपस्थित असल्याचे दिसत आहे. यावेळी अरबाजने शूराला एगेंजमेंट रिंग घातली आणि दोघांनी एकमेंकाना किसही केलं आहे. खास करून अरबाज खान आणि बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोराचा मुलगा अरहान खान, अर्पिता खानही यावेळी दिसले आहेत.
तर दुसरीकडे अरबाजचा मुलगा अरहान खान आणि बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडनची मुलगी राशा थंडानी दोघेजण मुंबईत एकत्रित फिरताना स्पॉट झाले. यावेळी अरहानने पांढऱ्या कलरचा टी-शर्ट आणि तपकिरी रंगाच्या ट्राऊजर परिधान केला होता. तर राशा डेनिम ब्लू कलरची जीन्स आणि ब्लॅक कलरचे ऑफ शोल्डर टॉपमध्ये ग्लॅमरस दिसली. दरम्यान अरहान आणि राशा दोघेजण त्याच्या कारच्या दिशेने जाताना पॉपाराझीच्या कॅमेऱ्याची नजर त्याच्यावर पडली. यानंतर हा व्हिडिओ खूपच व्हायर झाला आहे.
व्हायरल झालेल्या व्हिडीओनंतर राशा आणि अरहान दोघांच्या एकमेंकांना डेट करत असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. मात्र, ही चर्चा खरी आहे की नाही? यांची अधिकृत्त माहिती अद्याप मिळालेली नाही. तर अरबाज आणि शूराच्या लग्नाला राशा थडानी तिच्या आई रवीना टंडनसोबत गेली होती. ( Arbaaz-Arhaan Khan )
View this post on Instagram
A post shared by Bollywood_loverrrrrr (@bollywood__loverrrrrr)
View this post on Instagram
A post shared by sshura Khan (@sshurakhan)
Latest Marathi News इकडं अरबाजनं शूराला केलं प्रपोज तर तिकडं मुलगा राशाला करतोय डेट? Brought to You By : Bharat Live News Media.