Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क: अयोध्येतील राम मंदिरात २२ जानेवारीरोजी रामलल्लाची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. या पार्श्वभूमीवर छत्तीसगडमध्ये २२ जानेवारी हा दिवस ‘ड्राय डे’ म्हणून घोषित करण्याचा निर्णय मुख्यमंत्री विष्णू देव साय यांनी घेतला आहे. याबाबतची घोषणा २६ डिसेंबर ते २ जानेवारी दरम्यान चाललेल्या सुशासन सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी साय यांनी केली. Ayodhya Ram Mandir
मुख्यमंत्री विष्णू देव साय यांनी सांगितले की, छत्तीसगड सरकारने २५ डिसेंबर ते २ जानेवारी दरम्यान सुशासन सप्ताह साजरा केला. आमचा संकल्प आणि सुशासनाचा आदर्श रामराज्य आहे. प्रभू रामाचे आजोबांचे छत्तीसगडमधील ‘नानिहाल’ हे ठिकाण आहे. २२ जानेवारीरोजी अयोध्येत राम मंदिरात रामलल्लाची ‘प्राणप्रतिष्ठा’ होणार आहे, ही आमच्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. राज्यात २२ जानेवारीरोजी दिवाळीसारखे वातावरण असेल. घरोघरी दिवे लावले जातील. तर छत्तीसगड सरकारने राज्यात कोरडा दिवस म्हणून घोषित करण्याचा निर्णय घेतला आहे. Ayodhya Ram Mandir
ते पुढे म्हणाले की, अयोध्येतील या कार्यक्रमासाठी तांदूळ उत्पादक संस्थांनी सुमारे ३ हजार टन तांदूळ पाठविला आहे. भाजीपाला उत्पादकही भाजीपाला पाठवणार आहेत.
हेही वाचा
मोठी बातमी : राज्यात १८ ते २२ जानेवारी काळात राम मंदिर उत्सव
Ayodhya Ram Mandir : रामलल्लाला तिहेरी तलाक पीडिता स्वत:च्या हाताने बनवलेले कपडे देणार भेट
Ram Mandir Warning: सावधान..! QR कोडने रामभक्तांची लूट : VSP कडून सावधानतेचा इशारा
The post रामराज्याचा आदर्श घेत ‘या’ राज्याने घोषित केला २२ जानेवारी ‘ड्राय डे’ appeared first on Bharat Live News Media.