Pimpari : न्यू इंग्लिश स्कूलमध्ये स्नेहसंमेलन उत्साहात साजरे

वडगाव मावळ : येथील रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल विद्यालयामध्ये इंग्रजी, प्राथमिक, माध्यमिक व ज्युनिअर कॉलेजचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न झाले. तहसीलदार विक्रम देशमुख, गटशिक्षणाधिकारी सुदाम वाळुंज, रयत शिक्षण संस्थेचे पश्चिम विभागीय अधिकारी किसन रत्नपारखी, स्थानिक स्कूल कमिटी सदस्या माजी आमदार रुपलेखा ढोरे, सल्लागार समिती सदस्य मनोज ढोरे, विस्तार अधिकारी शोभा वहिले, केंद्रप्रमुख अजित … The post Pimpari : न्यू इंग्लिश स्कूलमध्ये स्नेहसंमेलन उत्साहात साजरे appeared first on पुढारी.

Pimpari : न्यू इंग्लिश स्कूलमध्ये स्नेहसंमेलन उत्साहात साजरे

वडगाव मावळ : येथील रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल विद्यालयामध्ये इंग्रजी, प्राथमिक, माध्यमिक व ज्युनिअर कॉलेजचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न झाले.
तहसीलदार विक्रम देशमुख, गटशिक्षणाधिकारी सुदाम वाळुंज, रयत शिक्षण संस्थेचे पश्चिम विभागीय अधिकारी किसन रत्नपारखी, स्थानिक स्कूल कमिटी सदस्या माजी आमदार रुपलेखा ढोरे, सल्लागार समिती सदस्य मनोज ढोरे, विस्तार अधिकारी शोभा वहिले, केंद्रप्रमुख अजित नवले, संजय अडसूळ, स्कूल कमिटी सदस्य विलास गोखले यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.
या वेळी लावणी, कोळीगीते, सोलो अक्टिंग, बालगीते, हिंदी चित्रपटातील गीते, संदेशपर गीते, देशभक्ती गीते अशा विविध घटकांवर आधारित 90 गाणी विद्यार्थ्यांनी सादर केली. तीन दिवस चाललेल्या या स्नेहसंमेलनाचा विद्यार्थ्यांनी मनसोक्त आनंद घेतला. प्राचार्य सतीश हाके, पर्यवेक्षिका प्रमिला गायकवाड, जयश्री लेंभे, सुनिता बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व पाहुण्यांचे
स्वागत केले.
हेही वाचा 

धुळे : चाचा नेहरु बाल महोत्सवाचे सीईओ गुप्ता यांच्या हस्ते उद्धाटन
Pimpari : मावळात जनआरोग्य योजना रुजवणार : तालुका काँग्रेस कमिटी
Mohammed Siraj : 15 धावांत 6 विकेट्स, सिराजपुढे द. आफ्रिकेची शरणागती

Latest Marathi News Pimpari : न्यू इंग्लिश स्कूलमध्ये स्नेहसंमेलन उत्साहात साजरे Brought to You By : Bharat Live News Media.