सई-सिद्धार्थच्या श्रीदेवी प्रसन्न चित्रपटाचा टिझर रिलीज
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : सई ताम्हणकर आणि सिद्धार्थ चांदेकरच्या आगळ्या-वेगळ्या लव्हस्टोरीनं फॅन्सना उत्सुकता लागून राहिली आहे. लग्न का करावं, कुणाशी करावं याची प्रत्येकाची आपली अशी कारणं आणि कल्पना असतात. (Sridevi Prasanna ) टीप्स मराठी प्रस्तुत आणि कुमार तौरानी निर्मित श्रीदेवी प्रसन्न चित्रपट म्हणजे लग्नासाठी योग्य जोडीदार शोधणाऱ्या श्रीदेवी-प्रसन्न या दोघांची कहाणी. टीप्स मराठीचा हा पहिला वहिला मराठी चित्रपट आहे. (Sridevi Prasanna )
संबंधित बातम्या –
Mahesh Babu-Namrata : महेश बाबू पत्नी नम्रतासोबत रोमाँटिक; खास पोस्टमध्ये लिहिलंय…
Sukh Mhanje Nakki Kay Asta: सावधान; शिर्के-पाटील कुटुंबाचा विनाश करणारी ‘शालिनी’ येणार परत
Suruchi Adarkar : सुरुची अडारकरचे पुनरागमन या मालिकेतून होणार
मराठीसोबतच बॉलीवूडमध्येही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवलेली ब्युटिफूल सई ताम्हणकर आणि सध्या मराठीतला आघाडीचा अभिनेता म्हणून ओळखला जाणारा हँडसम सिद्धार्थ चांदेकर पहिल्यांदाच टीप्स मराठीच्या श्रीदेवी प्रसन्न या चित्रपटाच्या माध्यमातून एकत्र मोठ्या पडद्यावर दिसणार आहेत. चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आणि यातील सई-सिद्धार्थची दिसून आलेली केमिस्ट्री आणि संवादांची जुगलबंदी चित्रपटाविषयीची उत्सुकता वाढवून गेली. विशाल विमल मोढवे दिग्दर्शित ‘श्रीदेवी प्रसन्न’ चित्रपट २ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे.
‘श्रीदेवी प्रसन्न’ या चित्रपटात सई आणि सिद्धार्थ या मुख्य व्यक्तिरेखांसोबतच सुलभा आर्या, सिद्धार्थ बोडके, रसिका सुनील, संजय मोने, वंदना सरदेसाई, समीर खांडेकर, आकांक्षा गाडे, रमाकांत डायमा, शुभांगी गोखले, पाहुल पेठे, पल्लवी परांजपे, पूजा वानखेडे, सिद्धार्थ महाशब्दे, जियांश पराडे हे कलाकार देखील महत्त्वाच्या व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहेत. या चित्रपटाच्या लेखनाची जबाबदारी अदिती मोघे यांनी उचलली असून मराठीतील प्रसिद्ध संगीतकार अमित राज यांनी यातील गाणी संगीतबद्द केली आहेत.
‘श्रीदेवी प्रसन्न’ या चित्रपटाचं नाव नुसतं फिल्मी नाही तर याचं कथानकच टोटल फिल्मी म्हणावं लागेल. ‘लव्ह एट फर्स्ट साईट’ चं स्वप्न मनात बाळगत प्रेमाच्या भन्नाट कल्पना विश्वात वावरणारा प्रसन्न, मॅट्रिमोनी साइटवर ‘श्रीदेवी’ या नावाच्या उत्सुकतेपोटी तिला रिक्वेस्ट पाठवतो आणि ती अॅक्सेप्ट देखील करते. या दोन टोकांच्या माणसांची मनं जुळतात की नाही,त्या दरम्यान नेमकं काय काय घडतं या कथानकाला ‘श्रीदेवी प्रसन्न’ चित्रपटाच्या माध्यमातून दिलेला फिल्मी तडका प्रेक्षकांना पाहता येणार आहे.
View this post on Instagram
A post shared by Tips Films (@tipsfilmsofficial)
View this post on Instagram
A post shared by Tips Films (@tipsfilmsofficial)
Latest Marathi News सई-सिद्धार्थच्या श्रीदेवी प्रसन्न चित्रपटाचा टिझर रिलीज Brought to You By : Bharat Live News Media.