Pimpari : जाधववाडी धरणातून पाणीपुरवठा करण्यास शेतकर्यांचा विरोध
इंदोरी : जाधववाडी धरणातून पाणी उचलण्यास परिसरातील शेतकर्यांनी विरोध केला आहे. तसेच, यासाठी आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. जाधववाडी धरणात 60 टक्के जलसाठा आहे. या धरणातून शेतासाठी पाणीपुरवठा केला जातो. या धरणाच्या पाण्याचा फायदा जाबंवडे, सदुंबरे, नवलाख उंब्रे परिसरातील शेतकर्यांना होत आहे.
धरणातील पाण्यावर ऊस, हरभरा, गहू, ज्वारी, बटाटा, कांदे आदी पिके शेतकरी घेतात. तसेच, या धरणात मोठ्या प्रमाणात मत्स्य व्यवसायही केला जातो. त्यामुळे या धरणातून चरोली पाणीपुरवठा जलजीवन प्रकल्पांर्तगत पाणीपुरवठा न करण्याची मागणी शेतकर्र्यांनी तहसीलदार यांच्याकडे केली आहे. तसेच, या संदर्भातील निवेदन त्यांना देण्यात आले आहे.
हेही वाचा
Pimpari : मावळात जनआरोग्य योजना रुजवणार : तालुका काँग्रेस कमिटी
बृजभूषण यांच्याकडून माझ्या कुटुंबाला धोका : साक्षी मलिकचा गंभीर आरोप
IND vs SA Test : सिराज वादळासमोर द. आफ्रिकेचे लोटांगण, 55 धावांत सर्वबाद
Latest Marathi News Pimpari : जाधववाडी धरणातून पाणीपुरवठा करण्यास शेतकर्यांचा विरोध Brought to You By : Bharat Live News Media.