Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : जागतिक पातळीवरील संमिश्र संकेताचे परिणाम आज ( बुधवार, दि.३ जानेवारी) देशातंर्गत शेअर बाजारावर दिसला. आजही विक्रीचे वर्चस्व पाहायला मिळाल्याने सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजारात घसरण झाली. बाजारातील चौफेर विक्रीत आयटी आणि धातू क्षेत्र आघाडीवर राहिले. अखेर आज व्यवहार बंद होताना सेक्सेक्स ५३५ अंकांची पडझडीने 71,386 वर स्थिरावला तर निफ्टीने १४८ अंकांच्या घसरणीसह २१,५१७ वर बंद झाला. यापूर्वी मंगळवारी ( दि.२) सेन्सेक्स ३७९ अंकांनी घसरुन ७१,८९२ वर बंद झाला होता. (Stock Market Closing Bell )
देशांतर्गत शेअर बाजारावर आज (दि.३) प्रारंभीच्या व्यवहारात जागतिक संकेतांचा परिणाम दिसले. विक्रीचा बाेलबाला राहिल्याने व्यवहाराची सुरुवात नकारात्मक झाली. २०० अंकांची घसरण अनुभवत सेन्सेक्स 71700 वर आला तर निफ्टीही 55 अंकांची पडझड अनुभवत 21,610 अंकांवर व्यवहार करताना दिसले.
विक्रीचे वर्चस्व, धातू आणि आयटी कंपन्यांच्या शेअर्सची सर्वाधिक विक्री
शेअर बाजारात आज विक्रीचे वर्चस्व राहिले. बाजारातील प्रमुख निर्देशांक लाल रंगात व्यवहार करताना दिसले. दुपारी सेन्सेक्स २५० अंकांनी घसरून 71,650 च्या खाली आला. निफ्टीही 80 अंकांच्या घसरणीसह 21,600 अंकांवर आला. बाजारात सर्वाधिक विक्री धातू आणि आयटी क्षेत्रातील कंपन्याच्या शेअर्सची सर्वाधिक विक्री पाहण्यास मिळाली. इन्फोसिस, टीसीएस, एचसीएल टेक, विप्रो, एलटीआयएम, एलटीआईमाइंडट्री, जेएसडब्ल्यू स्टील आणि हिंदाल्कोचे शेअर्स सर्वाधिक घसरले. तर आयटीसी सर्वाधिक लाभार्थी ठरते. तसेच मिड आणि स्मॉल कॅप निर्देशांकांनीही संमिश्र स्थिती अनुभवली. निफ्टीमध्ये हिंदाल्को, जेएसडब्ल्यू स्टील आणि टाटा स्टीलचे सर्वाधिक नुकसान झाले. एकीकडे धातू आणि आयटी कंपन्यांच्या शेअर्सची विक्री होताना दिसत असताना निवडक बँक आणि NBFC शेअर्स वधारले.
मिडकॅप, स्मॉलकॅप समभागांमध्ये खरेदी दिसून आली तर रिअॅल्टी, पीएसयू बँक, फार्मा निर्देशांक वाढीने बंद झाले. ऊर्जा, इन्फ्रा निर्देशांक वधारत बंद झाले. अखेर आज व्यवहार बंद होताना सेक्सेक्स ५३५ अंकांची पडझडीने 71,386 वर स्थिरावला तर निफ्टीने १४८ अंकांच्या घसरणीसह २१,५१७ वर बंद झाला. बजाज ऑटो, अदानी एंटरप्रायझेस, इंडयूइंड बॅक आणि आयटीएस कंपनीचे शेअर्सने सर्वाधिक तेजी अनुभवली तर हिंडाल्को, जीएसडब्ल्यू स्टील, टाट स्टील आणि एलटीमाइंडट्रीने सर्वाधिक घसरण पाहिली.
न्यायालयाच्या निकालानंतर अदानी समुहाचे शेअर्स सुसाट, ११ टक्क्यांनी वधारले
अदानी-हिंडेनबर्ग प्रकरणाचा तपास ‘सेबी’कडून ‘एसआयटी’कडे हस्तांतरित करण्याचे कोणतेही कारण नाही, असे आज (दि.३) सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले. न्यायालयाने 22 प्रकरणांचा तपास सेबीकडे सोपवला होता, त्यापैकी दोन प्रकरणांचा तपास अद्याप प्रलंबित आहे. उर्वरित दोन प्रकरणांची चौकशी ‘सेबी’ने तीन महिन्यांत पूर्ण करावी, असे निर्देशही दिले. या निकालामुळे अदानी समुहास मोठा दिलासा मिळाला आहे. या निर्णयानंतर अदानी ग्रुपच्या कंपन्यांचे शेअर्स सुमारे 11 टक्क्यांनी वधारले. समूहाचे सर्व शेअर्स हिरव्या रंगात व्यवहार करताना दिसले. एकीकडे विक्रीचा बोलबाला सुरु असताना अदानी समूहाची मुख्य कंपनी अदानी एंटरप्रायझेसच्या समभागात दिवसभरातील व्यवहारात 5 टक्क्यांनी वाढ झाल्याने गुंतवणूकदारांना दिलासा मिळाला. अदानी पोर्ट्समध्ये 2 टक्क्यांची वाढ दिसून आली. अदानी पोर्ट्स आणि अदानी एंटरप्रायझेस, हे दोन्ही समभाग आज निफ्टीच्या सर्वाधिक वाढणाऱ्या कंपन्यांमध्ये ठरल्या. तसेच अदानी विल्मर, अदानी ग्रीन एनर्जी, अदानी पॉवर, अदानी टोटल गॅस आणि अदानी एनर्जी सोल्युशन्स कंपन्यांचे शेअर्स 3 ते 11 टक्क्यांनी वधारले.
‘एका’ घोषणेमुळे बजाज ऑटो शेअर्सने गाठला उच्चांक
बजाज ग्रुपचे ऑटो युनिट बजाज ऑटोचे शेअर्स आज हिरव्या रंगात उघडले. बजाज ऑटोने शेअर बायबॅकशी संबंधित एक घोषणा केली. कंपनीने आज आपल्या एक्सचेंज फाइलिंगमध्ये यासंबंधीची माहिती दिली आहे. 8 जानेवारी रोजी होणाऱ्या कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत शेअर्सच्या बायबॅकचा विचार केला जाईल. या घोषणेवर, बजाज ऑटोच्या शेअर्संनी 5.96 टक्के वाढीसह 7059.75 रुपयांचा विक्रमी उच्चांक गाठला. बजाज ऑटोच्या समभागांनी गुंतवणूकदारांना प्रचंड परतावा दिला असून एका वर्षात गुंतवणूक दुप्पट झाली आहे. गेल्या वर्षी 12 जानेवारी 2023 रोजी तो 3522 रुपयांच्या एका वर्षाच्या नीचांकी पातळीवर होता. यानंतर, एका वर्षापेक्षा कमी कालावधीत, तो 100 टक्क्यांहून अधिक वाढला आणि आज 3 जानेवारी 2024 रोजी 7059.75 रुपयांचा विक्रमी उच्चांक गाठला आहे.
२०२४ मध्येही IPO चा पाऊस, २७ कंपन्यांना SEBI ची मान्यता
नूतन वर्ष 2024 मध्येही IPO गुंतवणूकदारांसाठी उत्तम ठरू शकते. या वर्षीही अनेक कंपन्या शेअर बाजारात सूचिबद्ध होण्याच्या तयारीत आहेत. अशा परिस्थितीत या वर्षीही गुंतवणूकदारांना गुंतवणुकीच्या मुबलक संधी मिळणार आहेत. एका रिपाेर्टनुसार , आतापर्यंत 27 कंपन्यांना एकूण 28,500 कोटी रुपयांचा निधी उभारण्यासाठी बाजार नियामक ‘सेबी’कडून मंजुरी मिळाली आहे.
हेही वाचा :
अर्थभान : चला, समजून घेऊ भांडवली बाजार
भारतीय अर्थव्यवस्था उसळणार; चीनची ढासळणार
Retirement Planning | निवृत्तीनंतरच्या आनंदी जीवनासाठी ‘असे’ करा आर्थिक नियोजन
Latest Marathi News ‘विक्री’चा बोलबाला, सेन्सेक्सने अनुभवली ५३५ अकांची पडझड! आज शेअर बाजारात काय घडलं? Brought to You By : Bharat Live News Media.