दोन आठवड्यांपासून तोरणा अंधारात

वेल्हे : Bharat Live News Media वृत्तसेवा : विद्युत रोहित्रात बिघाड झाल्यामुळे तोरणा गडावरील वीजपुरवठा ठप्प झाला आहे. विजेअभावी 20 डिसेंबरपासून तोरणा गड अंधारात आहे. त्यामुळे नवीन वर्षाच्या स्वागतासाठी गडावर येणार्या पर्यटकांसह गडावरील पहारेकरी, डागडुजीची कामे करणार्या मजुरांना गैरसोयींना तोंड द्यावे लागत आहे. सरत्या वर्षाच्या अखेरीस रोहित्राची दुरुस्ती करण्यात येणार होती. मात्र, अद्यापही रोहित्राचे काम रखडले आहे. स्थानिक मावळा संघटनेचे वेल्हे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर वेगरे, रामभाऊ राजीवडे, बापू साबळे, अशोक सावंत आदी कार्यकर्त्यांनी याबाबत वेल्हे येथील महावितरण कार्यालयाला निवेदन देत पर्यटकांची गैरसोय दूर करण्यासाठी गडावरील वीजपुरवठा तातडीने सुरू करण्याची मागणी केली आहे.
वारंवार होतोय वीजपुरवठा खंडित
राज्यातील अतिदुर्गम तोरणा गडावर स्वातंत्र्यानंतर प्रथमच वीज आली आहे. त्यामुळे गडावरील डागडुजीच्या कामाला गती आली असून, पर्यटकांची सोय झाली आहे. गडावरील खंडित वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरण अधिकारी, कर्मचार्यांना गडाच्या डोंगरकड्यातून धावपळ करावी लागत आहे. गडावर वीजपुरवठा सुरू झाल्यापासून वांरवार तो खंडित होत आहे.
तोरणागडाला वीजपुरवठा करणारे रोहित्र नादुरुस्त झाले आहे. तेथे नवीन रोहित्र बसविण्यात येणार आहे. महावितरणचे कार्यकारी अभियंता माणिक राठोड यांनी तातडीने कार्यवाही सुरू केली आहे. संबंधित ठेकेदाराकडून दोन दिवसांत रोहित्र बसविण्यात येणार आहे.
विनोद थेटे, शाखा अभियंता, महावितरण.
Latest Marathi News दोन आठवड्यांपासून तोरणा अंधारात Brought to You By : Bharat Live News Media.
