पिंपळनेर येथे श्रीराम मंदिर अक्षदा कलशाची शोभायात्रा

पिंपळनेर: (जि.धुळे) पुढारी वृत्तसेवा ;  प्रभू श्रीरामाचा जयघोष अयोध्या नगरी येथून आलेल्या अक्षता कलशाची शोभायात्रा पिंपळनेर शहरात काढण्यात आली. शोभायात्रा मार्गात राहणाऱ्या सर्व महिलांनी, नागरिकांनी रांगोळी काढून शोभायात्रेचे स्वागत केले. महिलांनी अक्षदा कलशाचे पुजन करून दर्शनाचा लाभ घेतला. रामभक्तांकडुन होणारा श्रीरामाचा जयघोष करीत टाळमृदुंगाच्या तालावर श्रीराम भक्त तल्लीन झाले होते. प्रभुश्रीरामाच्या जयघोषाने पिंपळनेर नगरी दुमदुमली … The post पिंपळनेर येथे श्रीराम मंदिर अक्षदा कलशाची शोभायात्रा appeared first on पुढारी.

पिंपळनेर येथे श्रीराम मंदिर अक्षदा कलशाची शोभायात्रा

पिंपळनेर: (जि.धुळे) Bharat Live News Media वृत्तसेवा ;  प्रभू श्रीरामाचा जयघोष अयोध्या नगरी येथून आलेल्या अक्षता कलशाची शोभायात्रा पिंपळनेर शहरात काढण्यात आली. शोभायात्रा मार्गात राहणाऱ्या सर्व महिलांनी, नागरिकांनी रांगोळी काढून शोभायात्रेचे स्वागत केले.
महिलांनी अक्षदा कलशाचे पुजन करून दर्शनाचा लाभ घेतला. रामभक्तांकडुन होणारा श्रीरामाचा जयघोष करीत टाळमृदुंगाच्या तालावर श्रीराम भक्त तल्लीन झाले होते. प्रभुश्रीरामाच्या जयघोषाने पिंपळनेर नगरी दुमदुमली होती. मंगल वाद्यांच्या सुरात शहरातील श्रीराम मंदिर, टेंभारोड, इंदिरानगर हनुमान मंदिर, पोलीस स्टेशन, बस स्टॅन्ड, विश्वनाथ चौक, होळी चौक, भोई गल्ली, महाराणा प्रताप चौक, नेताजी सुभाषचंद्र बोस चौक, नाना चौक, न्हावी हुडा, मुरलीधर मंदिर, एखंडे गल्ली, गोपाळ नगर, बाजारपेठ, गांधी चौक, माळी गल्लीतून श्रीराम मंदिरात शोभायात्रा विसर्जित करण्यात आली.
हेही वाचा :

‘डिवचले तर अमेरिका आणि दक्षिण कोरियाला संपवून टाका’; किम जोंग उन यांचे सैन्याला आदेश
Ayodhya Cleanliness campaign : PM माेदींचा १४ जानेवारीपासून अयाेध्‍या ‘स्वच्छता’ मोहिम संकल्‍प
Virtual Rape Case : धक्कादायक! ‘मेटाव्हर्स’मध्ये अल्‍पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार, गुन्‍हा दाखल

Latest Marathi News पिंपळनेर येथे श्रीराम मंदिर अक्षदा कलशाची शोभायात्रा Brought to You By : Bharat Live News Media.