उत्तर प्रदेशामध्‍ये ‘ऑनर किलिंग’, वडिलांकडून मुलीसह प्रियकराची हत्‍या

पुढारी ऑनलाईन डेस्क : उत्तर प्रदेशातील बदायूं जिल्ह्यातील कोतवाली बिलसी भागात आंतरजातीय विवाहाविरोधातून (ऑनर किलिंग) मुलीसह तिच्‍या प्रियकराची वडिलांनी हत्‍या केल्‍याची धक्कादायक घटना घडली. मुलीच्या प्रेमप्रकरणामुळे संतप्त पित्याने मंगळवारी (दि. २) सकाळी मुलीवर आणि तिच्या प्रियकरावर फावड्याने वार करून हत्या (UP Murder) केली. यानंतर वडिलांनी रक्ताच्या थारोळ्यात पोलीस ठाणे गाठले आणि आत्मसमर्पण केले. पोलिसांनी दिलेल्या … The post उत्तर प्रदेशामध्‍ये ‘ऑनर किलिंग’, वडिलांकडून मुलीसह प्रियकराची हत्‍या appeared first on पुढारी.
उत्तर प्रदेशामध्‍ये ‘ऑनर किलिंग’, वडिलांकडून मुलीसह प्रियकराची हत्‍या

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : उत्तर प्रदेशातील बदायूं जिल्ह्यातील कोतवाली बिलसी भागात आंतरजातीय विवाहाविरोधातून (ऑनर किलिंग) मुलीसह तिच्‍या प्रियकराची वडिलांनी हत्‍या केल्‍याची धक्कादायक घटना घडली. मुलीच्या प्रेमप्रकरणामुळे संतप्त पित्याने मंगळवारी (दि. २) सकाळी मुलीवर आणि तिच्या प्रियकरावर फावड्याने वार करून हत्या (UP Murder) केली. यानंतर वडिलांनी रक्ताच्या थारोळ्यात पोलीस ठाणे गाठले आणि आत्मसमर्पण केले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बिल्सी येथील परौली गावात राहणारा अनुचिन (वय २०) आणि त्याच गावातील महेश याची मुलगी नीतू (वय २०) यांचे दोन वर्षांपासून एकमेकांवर प्रेम होते. घरच्यांनाही याची माहिती होती. सचिन आणि नीतूच्या नात्यावरून दोन्ही कुटुंबांमध्ये तणाव होता. कुटुंबीयांनी दोघांनाही या प्रेमप्रकरणाला विरोध केला पण तरीही ते संपर्कात राहिले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन सोमवारी मध्यरात्री नीतूला तिच्या घरी भेटण्यासाठी आला होता. दोघेही नीतूच्या घराच्या दारात बसले होते. पहाटे साडेचारच्या सुमारास आवाज ऐकून नीतूच्या कुटुंबीयांना जाग आली. सर्वांनी मिळून सचिन आणि नीतू यांच्यावर हल्ला केला. कुटुंबीयांनी दोघांनाही बेदम मारहाण केली. नीतूचे वडील महेश यांनी दोघांचीही फावड्याने वार करून खून केला. घटनेनंतर मुलीच्या इतर कुटुंबीयांनी घटनास्थळावरून पळ काढला मात्र नीतूचे वडील महेश फावडे घेऊन पोलीस ठाणे गाठले आणि तेथे आत्मसमर्पण केले.
वरिष्ठ पोलीस अधीक्षक ओपी सिंग यांनी घटनास्थळाची पाहणी केली आणि पोलीस पथकाला आवश्यक सूचना दिल्या. यावेळी बोलतना सिंग म्हणाले की, सचिनच्या कुटुंबीयांच्या तक्रारीवरून याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून पुढील कारवाई सुरू आहे.
हेही वाचा

नाशिक परिक्षेत्रात ५५९ मद्यपी चालकांवर कारवाई
Jalgaon Theft News : दोघांना मारहाण करुन पेट्रोलची चोरी, गुन्हा दाखल
सातारा : फलटण येथे वसतिगृहातील 20 विद्यार्थिनींना विषबाधा

Latest Marathi News उत्तर प्रदेशामध्‍ये ‘ऑनर किलिंग’, वडिलांकडून मुलीसह प्रियकराची हत्‍या Brought to You By : Bharat Live News Media.