टूथब्रशचा प्रथम वापर केव्‍हा झाला? जाणून घ्‍या रंजक माहिती

नवी दिल्ली : मौखिक आरोग्य राखणे हे अत्यंत महत्त्वाचे असते. त्याची जाणीव माणसाला जुन्या काळापासूनच आहे. प्राचीन काळातील लोकही दात व तोंड स्वच्छ ठेवत असत. आपल्याकडे कडुनिंबाच्या काड्यांचे ‘दातुन’ वापरले जात होते व आजही त्यांचा वापर होत असतो. मात्र आधुनिक काळात दात स्वच्छ करण्यासाठी टूथब्रश वापरले जातात. हे टूथब्रश आताच आले असे नाही. त्यांची काही … The post टूथब्रशचा प्रथम वापर केव्‍हा झाला? जाणून घ्‍या रंजक माहिती appeared first on पुढारी.

टूथब्रशचा प्रथम वापर केव्‍हा झाला? जाणून घ्‍या रंजक माहिती

नवी दिल्ली : मौखिक आरोग्य राखणे हे अत्यंत महत्त्वाचे असते. त्याची जाणीव माणसाला जुन्या काळापासूनच आहे. प्राचीन काळातील लोकही दात व तोंड स्वच्छ ठेवत असत. आपल्याकडे कडुनिंबाच्या काड्यांचे ‘दातुन’ वापरले जात होते व आजही त्यांचा वापर होत असतो. मात्र आधुनिक काळात दात स्वच्छ करण्यासाठी टूथब्रश वापरले जातात. हे टूथब्रश आताच आले असे नाही. त्यांची काही जुनी रूपंही पाहायला मिळतात. तज्ज्ञांच्या मते टूथब्रशचा इतिहास पाचशे वर्षे जुना आहे.
टूथब्रशचे पहिले पेटंट 26 जून 1948 रोेजी
दिवसातून दोन वेळा ब्रश करणे आवश्यक आहे, असे आपल्याला डॉक्टर सांगत असतात. त्यासाठी वेगवेगळ्या प्रकाराने तयार केलेली भुकटी किंवा मंजनचाही जुन्या काळापासून वापर होत आला आहे. ही भुकटी किंवा मंजन बोटांच्या सहाय्याने लावले जात असे. मात्र त्यासाठी ब्रशचाही वापर होऊ लागला. लाकडाच्या टूथब्रशचे पहिले पेटंट 26 जून 1948 रोेजी करण्यात आले होते. चीनच्या राजाने हे पेटंट केले होते. लाकडाच्या या ब्रशमध्ये जनावरांचे केस वापरले होते. काही वेळा असा ब्रश प्राण्यांच्या हाडांचा वापर करूनही बनवला जात असे.
१९३८ नंतर टूथब्रशमध्‍ये झाले आमूलाग्र बदल
1938 नंतर यामध्ये आमूलाग्र बदल होत गेले. प्राण्यांच्या केसांऐवजी ब्रिस्टलमध्ये नायलॉनच्या धाग्यांचा वापर करण्यात आला. 1939 मध्ये इलेक्ट्रिक ब्रश तयार करण्यात आला. अशा इलेक्ट्रिक ब्रशची आता बरीच चलती आहे. या ब्रशमुळे तोंडाच्या कानाकोपर्‍याची सफाई होऊ शकते.
हेही वाचा :

अरविंद केजरीवाल आजही ईडीच्या चौकशीला मारणार ‘दांडी’
Virtual Rape Case : धक्कादायक! ‘मेटाव्हर्स’मध्ये अल्‍पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार, गुन्‍हा दाखल
Mahua Moitra : माजी खा. महुआ मोइत्रा नव्या वादात; प्रियकरावर बेकायदेशीर पाळत ठेवल्याचा आरोप

Latest Marathi News टूथब्रशचा प्रथम वापर केव्‍हा झाला? जाणून घ्‍या रंजक माहिती Brought to You By : Bharat Live News Media.