Servants of India Society : मिलिंद देशमुख व सदस्यांची ’मिलीभगत’!

पुणे : पुढारी वृत्तसेवा : सर्व्हन्ट्स ऑफ इंडिया सोसायटीची स्थापना ज्या उद्देशासाठी केली त्याचा कडेलोट करून स्वतःच्या मुलांना संस्थेत आजीवन सदस्य करून संस्थेची मालमत्ता आपसात वाटून खाण्यासाठी सर्व सदस्यांची मिलीभगत सुरू आहे. गोखले अर्थशास्त्र संस्थेचे कुलगुरू डॉ. अजित रानडे हे पात्र नसतानाही त्यांनी निवड केली गेली. याबाबत पुरावे देऊन अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. … The post Servants of India Society : मिलिंद देशमुख व सदस्यांची ’मिलीभगत’! appeared first on पुढारी.

Servants of India Society : मिलिंद देशमुख व सदस्यांची ’मिलीभगत’!

पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : सर्व्हन्ट्स ऑफ इंडिया सोसायटीची स्थापना ज्या उद्देशासाठी केली त्याचा कडेलोट करून स्वतःच्या मुलांना संस्थेत आजीवन सदस्य करून संस्थेची मालमत्ता आपसात वाटून खाण्यासाठी सर्व सदस्यांची मिलीभगत सुरू आहे. गोखले अर्थशास्त्र संस्थेचे कुलगुरू डॉ. अजित रानडे हे पात्र नसतानाही त्यांनी निवड केली गेली. याबाबत पुरावे देऊन अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही.
मुरली कृष्णा यांनी डॉ. अजित रानडे हे अनधिकृत कुलगुरू असल्याचे पुरावे विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नियमाच्या आधारे निदर्शनास आणून दिले. त्याची माहिती सर्व संबंधित विभागाला ई-मेल तथा पत्रव्यवहाराव्दारे दिली. मात्र डॉ अजित रानडे यांच्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही. सर्व्हन्ट्स ऑफ इंडिया सोसायटीच्या शिफारशीवरून कुलपती निवडून गोखले इन्स्टिट्यूटच्या कुलगुरूंची निवडप्रक्रिया सुरू असताना अजित रानडे यांनी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नियमनानुसार पात्रता पूर्ण न करता 2021 मध्ये कुलगुरूपद प्राप्त केले. अजित रानडे यांच्याबाबतचा तपशील माहिती अधिकारात माहिती देण्यासाठी नकार दिला जात आहे. एवढ्या सर्व बाबी सर्व्हन्ट्स ऑफ इंडिया सोसायटीचे अध्यक्ष दामोदर, सचिव मिलिंद देशमुख यांच्या कार्यकाळात सुरू आहेत.
कुठलाही ठराव न घेता बदल सुरू
या धोरणाला विरोध करणार्‍यांना संस्थेतून बाहेर काढले जाते. संस्थेचा विकास 1990 पासून रखडला आहे. आजीवन सदस्य मिलिंद देशमुख यांनी तो होऊ दिलेला नाही. मात्र, त्यांच्या मुलाला आजीवन सदस्य करण्याची घाई धर्मादायमध्ये बदल अर्ज, कुठलाही ठराव न घेता दाखल करणे या कृतीवरून दिसून येत आहे. यावर प्रवीणकुमार राऊत यांनी नोंदवलेल्या हरकत प्रकरणात सर्व्हन्ट्स ऑफ इंडिया सोसायटीचे मिलिंद देशमुख यांची ’मिलीभगत’ अध्यक्ष साहू प्रेमकृष्ण द्विवेदी यांच्यासोबत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. अध्यक्ष दामोदर साहू हे डोळे मिटून आहेत. त्यांचा मुलगा अन् द्विवेदी यांचा नातू हे आजीवन सदस्य होत आहेत. हे सर्व धर्मदायमध्ये सुरू असलेल्या बदल अर्ज हरकत प्रकरणात निदर्शनास आले आहे.
कुलगुरू अजित रानडे यांच्या बचावाचे कारण काय ?
मिलिंद देशमुख यांना त्यांचा मुलगा चिन्मय देशमुख याला सर्व्हन्ट्स ऑफ इंडिया सोसायटीमध्ये सदस्य करून त्याच्या हातात तिजोरीच्या चाव्या ठेवायच्या आहेत. त्या माध्यमातून सर्व मालमत्ता स्वतःच्या कुटुंबाला उपभोगण्यासाठी म्हणून अध्यक्ष दामोदर साहू आणि प्रेमकृष्ण द्विवेदी यांच्यासोबत त्यांनी ’मिलीभगत’ केली आहे. बहीण कायदेशीर सल्लागार, मुलगा व्यवस्थापक अशी जुनी फिल्डिंग लावणारे मिलिंद देशमुख यांनी त्यांचे मेहुणे सागर काळे यांनासुद्धा रानडे इन्स्टिट्यूटच्या सोळा एकर जमीन हडप प्रकरणात समाविष्ट केले.
त्याची न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे. या सर्व प्रकरणाची तपासणी झालेली नाही. तसेच आरोपींवर कारवाई केली जात नाही. प्राप्तिकर विभाग, न्यायालय, पोलिस कचेरीत तक्रारी दाखल असूनही गोखले इन्स्टिट्यूटच्या कुलगुरूच्या निवडीसाठी जबाबदार असणारे सर्व्हन्ट्स ऑफ इंडिया सोसायटीचे अध्यक्ष व सचिव हे कुलगुरू अजित रानडे यांचा बचाव करीत आहेत. याचे कारण म्हणजे सर्व्हन्ट्स ऑफ इंडिया सोसायटीचे आर्थिक लाभ पदरात पाडू घेण्यासाठीच असल्याची चर्चा आहे.
सदर तक्रार ही शासनाची दिशाभूल करणारी आहे. ज्या आधारावर ही तक्रार करण्यात आलेली आहे त्यामध्ये पूर्णतः तथ्य नसून सर्व बाजूंचा सारासार विचार करण्यात आलेला नाही. याशिवाय तक्रारकर्ते संस्थेचे माजी कर्मचारी असून त्यांना गैरवर्तणुकीवरून 22 जानेवारी 2018 रोजी निलंबित करण्यात आले होते. त्यामुळे ही कृती पूर्वग्रहदूषित असल्याचे लक्षात येते.
– कर्नल कपिल जोध, कुलसचिव, गोखले, अर्थशास्त्र संस्था, पुणे

हेही वाचा

AIFF : ९ व्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन आजपासून
फेलोशिपसाठी संशोधक आक्रमक; सारथी कार्यालयासमोर आंदोलन
नाशिक मनपा नोकरभरतीसाठी प्रश्नपत्रिका अंतिम टप्प्यात 

Latest Marathi News Servants of India Society : मिलिंद देशमुख व सदस्यांची ’मिलीभगत’! Brought to You By : Bharat Live News Media.