नाट्य संमेलनाची तयारी अंतिम टप्प्यात; मान्यवरांकडून पाहणी

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : शंभरावे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपले आहे. चिंचवडगाव येथील श्री मोरया गोसावी क्रीडा संकुलावर 6 व 7 जानेवारी 2024 दरम्यान या नाट्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून, येथील मुख्य सभामंडपाची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. नाट्य संमेलनाचे आयोजक, अ. भा. मराठी नाट्य परिषद पिंपरी चिंचवड … The post नाट्य संमेलनाची तयारी अंतिम टप्प्यात; मान्यवरांकडून पाहणी appeared first on पुढारी.

नाट्य संमेलनाची तयारी अंतिम टप्प्यात; मान्यवरांकडून पाहणी

पिंपरी : Bharat Live News Media वृत्तसेवा : शंभरावे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपले आहे. चिंचवडगाव येथील श्री मोरया गोसावी क्रीडा संकुलावर 6 व 7 जानेवारी 2024 दरम्यान या नाट्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून, येथील मुख्य सभामंडपाची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे.
नाट्य संमेलनाचे आयोजक, अ. भा. मराठी नाट्य परिषद पिंपरी चिंचवड शाखेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पिंपरी -चिंचवड शाखेचे कार्याध्यक्ष राजेशकुमार साकला व उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल, उद्योजक राजेंद्र जैन, क्रीडा विभागाचे उपायुक्त मिनिनाथ दंडवते, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे स्विय सहायक विकास पाटील, नाटय संमेलनाचे मुख्य नेपथ्यकर श्याम भूतकर, सुदाम परब, संतोष पाटील आदी पदाधिकार्‍यांनी मुख्य सभामंडपाची पाहणी करून तयारीचा आढावा घेतला.
भाऊसाहेब भोईर म्हणाले, संपूर्ण मैदानावर तब्बल 65 हजार स्क्वेअर फुटांचा मांडव नाट्य संमेलनासाठी घालण्यात आला असून, यामध्ये 5 हजार रसिक प्रेक्षकांसाठी आसन व्यवस्था करण्यात आली आहे. नाट्य संमेलनात दोन दिवसांत भरगच्च कार्यक्रम असल्याने कलाकारांच्या सोईसाठी 5 ग्रीन रूम, एक वातानुकूलित व्हीआयपी रूम तयार करण्यात आली आहे. तसेच सभा मंडपात एलईडी स्क्रीन लावण्यात येणार आहेत. मुख्य सभामंडपाला ’सूर्यमाला सभामंडप’ असे नाव देण्यात आले असून रंगमंचाला ‘आद्यनाटककार कै. विष्णुदास भावे रंगमंच’ असे नाव देण्यात आले आहे. तर प्रवेशद्वाराला पै. क्रांतिवीर चापेकर बंधू प्रवेशद्वार व महान साधू मोरया गोसावी प्रवेशद्वार अशी नावे देण्यात आली आहेत.
नाट्य संमेलनाच्या तयारीविषयी समाधान व्यक्त करताना डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील म्हणाले, ज्याप्रमाणे नाट्य रसिकांना या 100 व्या नाट्य संमलेनासाठी उत्सुकता आहे. तसेच आम्हीदेखील उत्सुक आहोत. याच उद्योग नगरीत आम्ही 2016 मध्ये 89 वे साहित्य संमेलन घेतल्यामुळे आयोजनासाठी किती कष्ट घ्यावे लागतात याची आम्हाला कल्पना आहे. भाऊसाहेबांनी ही सगळी तयारी अगदी कमी वेळात केली.
शिवाय प्रत्येक कामासाठी योग्य व्यक्तींची निवड करणे हे भाऊसाहेबांचे वैशिष्ट्य आहे. यामुळेच त्यांनी नाट्य संमेलनाच्या सजावटीची जबाबदारी राष्ट्रीय पारितोषिक प्राप्त कला दिग्दर्शक श्याम भूतकर यांची निवड केली. शिवाय पिंपरीत झालेल्या 79 व्या नाट्य संमेलनाचा मांडव ज्यांनी घातला होता. त्यांनीच 100 व्या नाट्य संमेलनाचा मांडव घातला आहे. तसेच मुख्य सभामंडपात आजवर झालेल्या 99 नाट्य संमेलनाच्या अध्यक्षांचे फोटो लावण्यात आले आहेत. नाट्य संमेलनाच्या प्रत्येक बाबीमध्ये वैविध्य आणण्याचा प्रयत्न कौतुकास्पद आहे, त्यामुळे हे 100 वे नाट्य संमेलन ऐतिहासिक ठरेल याविषयी काही शंका नाही, असेही पाटील यांनी सांगितले.
हेही वाचा

पुण्यात बीएच सिरीज घेण्यात दुपटीने वाढ
Assam Accident : आसाममध्ये भीषण अपघात; बस आणि ट्रकच्या धडकेत १४ ठार, २७ जखमी
Nashik News : भाजप ओबीसी मोर्चाची आज विभागीय बैठक

Latest Marathi News नाट्य संमेलनाची तयारी अंतिम टप्प्यात; मान्यवरांकडून पाहणी Brought to You By : Bharat Live News Media.