महावितरण भरतीत आता वीजतंत्री, तारतंत्री अभ्यासक्रमांचा समावेश

पुणे : पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र राज्य कौशल्य, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळाच्या (पूर्वाश्रमीचे महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळ) दोन वर्ष कालावधीच्या वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन) आणि तारतंत्री (वायरमन) अभ्यासक्रम प्रमाणपत्रांचा समावेश महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी यांच्या विद्युत सहायक या पदभरती जाहिरातीतील शैक्षणिक पात्रतेमध्ये केला आहे. त्यामुळे सबंधित अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना आता महावितरणमध्ये कामाची संधी मिळणार … The post महावितरण भरतीत आता वीजतंत्री, तारतंत्री अभ्यासक्रमांचा समावेश appeared first on पुढारी.

महावितरण भरतीत आता वीजतंत्री, तारतंत्री अभ्यासक्रमांचा समावेश

पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : महाराष्ट्र राज्य कौशल्य, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळाच्या (पूर्वाश्रमीचे महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळ) दोन वर्ष कालावधीच्या वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन) आणि तारतंत्री (वायरमन) अभ्यासक्रम प्रमाणपत्रांचा समावेश महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी यांच्या विद्युत सहायक या पदभरती जाहिरातीतील शैक्षणिक पात्रतेमध्ये केला आहे. त्यामुळे सबंधित अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना आता महावितरणमध्ये कामाची संधी मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण क्षेत्राकरिता, कौशल्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी मंडळामार्फत विविध कौशल्यांवर आधारित अभ्यासक्रम तयार करण्यात येतात आणि सदर अभ्यासक्रम महाराष्ट्रातील विविध संस्थांमार्फत राबविण्यात येतात. मंडळाच्या अभ्यासक्रमांचा समावेश नोकरभरतीमध्ये केल्यामुळे राज्यातील विविध कौशल्यपूर्ण व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशाला चालना व गती मिळेल, असे कौशल्यमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले.
मंडळाच्या अभ्यासक्रमांचा नोकर भरतीसाठी समावेश महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीने करणे स्वागतार्ह आहे. इतर विभागांनीही त्यांच्या पदभरतीमध्ये मंडळाच्या विविध अभ्यासक्रमांचा समावेश करावा, असे आवाहन लोढा यांनी केले. मंडळास नुकतेच राष्ट्रीय व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण परिषद, केंद्रीय कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालयाची संलग्नता प्राप्त झाली आहे. या मान्यतेमुळे मंडळाच्या अभ्यासक्रमांना एनएसक्यूएफ दर्जा प्राप्त करून घेणे, त्याप्रमाणे एनएसक्यूएफ प्रमाणपत्र निर्गमित देणे शक्य होईल. तसेच मंडळाचे प्रमाणपत्र राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त होतील. याव्दारे श्रेयांक हस्तांतरण, उच्च शिक्षणाच्या संधी, राष्ट्रीय पातळीवर अभ्यासक्रमांना मान्यता, शिकाऊ प्रशिक्षण उमेदवारी योजनेचा लाभ घेणे शक्य होईल.
हेही वाचा

Pune News : मद्यासह एक कोटीचा मुद्देमाल जप्त
Pune News : मद्यासह एक कोटीचा मुद्देमाल जप्त
घटना पूर्वनियोजित; दहशत माजविण्याचा प्रयत्न : अमल महाडिक

Latest Marathi News महावितरण भरतीत आता वीजतंत्री, तारतंत्री अभ्यासक्रमांचा समावेश Brought to You By : Bharat Live News Media.