टोकियोत दोन विमानांची टक्कर; आगीत 5 क्रू मेंबर्सचा मृत्यू

टोकियो; वृत्तसंस्था : जपानमध्ये एकीकडे भूकंपाच्या मालिकेने उत्पात माजवलेला असताना, दुसरीकडे राजधानी टोकियोमधील हानेडा विमानतळावर मंगळवारी भीषण दुर्घटना घडली आहे. जपान एअरलाईन्सच्या जेएएल 516 या विमानाशी तटरक्षक दलाच्या विमानाची धडक होऊन त्यात प्रवासी विमान जळून खाक झाले. यामध्ये प्रवासी विमानातील पाच क्रू मेंबर्सचा मृत्यू झाला असून, अग्निशमन दलाच्या जवानांनी आपला जीव पणाला लावून 379 प्रवाशांची … The post टोकियोत दोन विमानांची टक्कर; आगीत 5 क्रू मेंबर्सचा मृत्यू appeared first on पुढारी.

टोकियोत दोन विमानांची टक्कर; आगीत 5 क्रू मेंबर्सचा मृत्यू

टोकियो; वृत्तसंस्था : जपानमध्ये एकीकडे भूकंपाच्या मालिकेने उत्पात माजवलेला असताना, दुसरीकडे राजधानी टोकियोमधील हानेडा विमानतळावर मंगळवारी भीषण दुर्घटना घडली आहे. जपान एअरलाईन्सच्या जेएएल 516 या विमानाशी तटरक्षक दलाच्या विमानाची धडक होऊन त्यात प्रवासी विमान जळून खाक झाले. यामध्ये प्रवासी विमानातील पाच क्रू मेंबर्सचा मृत्यू झाला असून, अग्निशमन दलाच्या जवानांनी आपला जीव पणाला लावून 379 प्रवाशांची सुखरूप सुटका केली. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे.
धावपट्टीवर धावत्या विमानाने पेट घेतल्याचे व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहेत. विमानतळावरील कर्मचारी आणि अग्निशमन दलानेे आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करून आतील 379 प्रवाशांची सुटका केली. मात्र, क्रू मेंबर्सना ते वाचवू शकले नाहीत. धावपट्टीवर तटरक्षक दलाचे विमान आणि प्रवासी विमानाची धडक झाल्यामुळे आग लागली, असे विमानतळावरील अग्निशमन दलाकडून सांगण्यात आले. जपानच्या परिवहन आणि पर्यटन मंत्रालयाने तातडीने या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. विमानाला लागलेल्या आगीच्या ज्वाळा दूरवरूनही नजरेस पडत होत्या.
यापूर्वीची दुर्घटना 1985 मध्ये
गेल्या चार दशकांमध्ये जपानमध्ये अशी कोणतीही मोठी विमान दुर्घटना झालेली नाही. याआधी 1985 मध्ये टोकियोहून ओसाकाला जाणार्‍या जम्बो जेटचा मध्य गुनमा भागात अपघात झाला होता. या दुर्घटनेत 520 प्रवासी मृत्युमुखी पडले होते.

Latest Marathi News टोकियोत दोन विमानांची टक्कर; आगीत 5 क्रू मेंबर्सचा मृत्यू Brought to You By : Bharat Live News Media.