नंदुरबार पोलिसांची जेष्ठ नागरिकांसोबत दिवाळी
नंदुरबार -: नंदुरबार जिल्हा पोलीस दल नेहमीच समाजोपयोगी नव-नविन उपक्रम राबविण्यात अग्रेसर असते. यावर्षी देखील नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांच्या संकल्पनेतून जिल्हा पोलीस दलाने जेष्ठ नागरिकांसोबत दिवाळी साजरी करण्यात आली.
ज्यांचे वय 60 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त आहे अशा स्त्री, पुरुष व्यक्तींना जेष्ठ नागरिक म्हणून संबोधण्यात येते. त्याअनुषंगाने नंदुरबार शहर पोलीस ठाणे येथे नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नंदुरबार जिल्ह्यातील जेष्ठ नागरिकांसाठी दीपावली स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. जेष्ठ नागरिकांना दिवाळीच्या शुभेच्छा देवून त्यांच्या सोबत फराळ केला. तसेच उपस्थित पोलीस अधिकारी यांनी सदर स्नेह मेळाव्यास उपस्थित असलेल्या जेष्ट नागरिकांची आपुलकीने विचारपुस करुन जेष्ठ नागरिकांना त्यांचे जागेवर जावून जेष्ट नागरिकांना पुष्पगुच्छ व भेटवस्तू दिली. तसेच जेष्ठ नागरिकांच्या अडीअडचणी ऐकून घेवून त्या सोडविण्याचा प्रयत्न करण्यासाठी नंदुरबार जिल्हा पोलीस दल सदैव आपल्या पाठीशी आहे असे आश्वासन दिले. त्याचप्रमाणे संकटकालीन परिस्थितीत जेष्ट नागरिकांना पोलीसांची मदत मिळणेबाबत कायदेशीर मार्गदर्शनही केले.
कायदा व सुव्यवथा राखतांना नेहमीच रस्त्यावर चौकात उभे राहुन कारवाई किंवा लाठी उगारणारा पोलीस नेहमीच पहायला मिळातो, परंतु नंदुरबार जिल्हा पोलीस दलाने जेष्ठ नागरिकांसोबत दिवाळी साजरी करुन पोलीसांची समाजाप्रती असलेली बांधिलकी यानिमित्ताने दिसून आली आहे. पोलीस दलाने जेष्ट नागरिकांसोबत दिवाळी साजरा करण्याचा हा पहिलाच प्रसंग असल्याचे जेष्ठ नागरिक पितांबर सरोदे यांनी सांगून जिल्हा पोलीस दलाचे कौतूक करुन आभार व्यक्त केले.
कार्यक्रमास उपस्थित असलेले जेष्ठ नागरिक आत्माराम इंदवे यांनी नंदुरबार जिल्हा पोलीस दलाने जिल्ह्यात राबविलेले विविध समाजोपयोगी उपक्रम तसेच जेष्ठ नागरिकांसाठी केलेल्या कामाचे कौतुक करुन जेष्ठ नागरिकांसाठी असा स्तुत्य उपक्रम राबविल्याबद्दल उपस्थित असलेल्या जेष्ठ नागरिकांच्यावतीने जिल्हा पोलीस दलाचे आभार व्यक्त केले. जेष्ठ नागरिकांच्यावतीने नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांचा वृक्षप्रेमी असा उल्लेख करत वृक्षाचे लहान रोप शाल, श्रीफळ देवून सत्कार केला.
नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी जेष्ट नागरिकांसाठी पोलीस अधीक्षक कार्यालयात स्वतंत्र जेष्ठ नागरिक कक्ष स्थापन केला असून जेष्ट नागरिकांच्या काही समस्या किंवा अडचणी असतील तर त्यांनी जेष्ठ नागरिक कक्ष येथे येवून आपल्या समस्या मांडाव्यात निश्चीतच त्यांच्या सर्व समस्यांचे निराकरण करुन समस्या सोडविल्या जातील असे नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी यावेळी सांगितले.
सदर जेष्ठ नागरिक स्नेह मेळाव्यास नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील, नंदुरबार उप विभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन, नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निवृत्ती पवार, पोलीस उप निरीक्षक विकास गुंजाळ, नंदुरबार शहर पोलीस अधिकारी व अंमलदार तसेच जेष्ठ नागरिक पितांबर सरोदे, आत्माराम इंदवे, बी.एस. पाटील, अॅड. पी. एन. देशपांडे यांचेसह 45 ते 50 जेष्ठ नागरिक उपस्थित होते.
हेही वाचा :
‘ओबीसी, आर्थिक मागास मुलींचे शैक्षणिक शुल्क शासन भरणार’
सांगली : ४० हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार लाचलुचपतच्या जाळ्यात
Mohd Shami’s wife : चांगला खेळाडू आहे, त्याप्रमाणे त्याने चांगला माणूसही बनावे : शमीची विभक्त पत्नी
The post नंदुरबार पोलिसांची जेष्ठ नागरिकांसोबत दिवाळी appeared first on पुढारी.
नंदुरबार -: नंदुरबार जिल्हा पोलीस दल नेहमीच समाजोपयोगी नव-नविन उपक्रम राबविण्यात अग्रेसर असते. यावर्षी देखील नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांच्या संकल्पनेतून जिल्हा पोलीस दलाने जेष्ठ नागरिकांसोबत दिवाळी साजरी करण्यात आली. ज्यांचे वय 60 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त आहे अशा स्त्री, पुरुष व्यक्तींना जेष्ठ नागरिक म्हणून संबोधण्यात येते. त्याअनुषंगाने नंदुरबार शहर पोलीस ठाणे …
The post नंदुरबार पोलिसांची जेष्ठ नागरिकांसोबत दिवाळी appeared first on पुढारी.