विदर्भातील पंपावर पेट्रोल साठा संपला, गॅसलाही चालक संपाचा फटका 

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : मागील दोन दिवसांपासून सोशल मीडियामध्ये पेट्रोल पंप संचालकांचा संप सुरु असल्याच्या बातम्या सुरु आहेत. त्यामुळे सर्व पेट्रोल पंपावर प्रचंड गर्दी आहे. मुळात पेट्रोल पंप संचालकांचा कोणताही संप नाही. ट्रक, टँकर, बस चालविणाऱ्या वाहन चालकांनी संप पुकारलेला आहे. टँकर्स येत नसल्याने आज रात्रीपर्यंत विदर्भातील पेट्रोल पंपावर साठा संपेल अशी माहिती विदर्भ पेट्रोलियम … The post विदर्भातील पंपावर पेट्रोल साठा संपला, गॅसलाही चालक संपाचा फटका  appeared first on पुढारी.

विदर्भातील पंपावर पेट्रोल साठा संपला, गॅसलाही चालक संपाचा फटका 

नागपूर; Bharat Live News Media वृत्तसेवा : मागील दोन दिवसांपासून सोशल मीडियामध्ये पेट्रोल पंप संचालकांचा संप सुरु असल्याच्या बातम्या सुरु आहेत. त्यामुळे सर्व पेट्रोल पंपावर प्रचंड गर्दी आहे. मुळात पेट्रोल पंप संचालकांचा कोणताही संप नाही. ट्रक, टँकर, बस चालविणाऱ्या वाहन चालकांनी संप पुकारलेला आहे. टँकर्स येत नसल्याने आज रात्रीपर्यंत विदर्भातील पेट्रोल पंपावर साठा संपेल अशी माहिती विदर्भ पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष अमित गुप्ता यांनी पत्रपरिषदेत दिली. दुसरीकडे घरगुती वापराचा गॅस पुरवठाही प्रभावित झाला आहे. जिल्हाधिकारी यांनी बैठक घेतली. खापरी डेपो येथून टँकर्सना पोलिस सुरक्षा देण्याची ग्वाही दिली मात्र कुणीही चालक गाडी चालविण्यास तयार नसल्याचे त्यांनी एका प्रश्नाचे उत्तर दिले. पेट्रोल पंपावर होणारा पुरवठा खंडित झालेला आहे त्यामुळे अनेक पंप ड्राय झालेले आहेत.

वाहन चालकांच्या संपाचे कारण सांगताना भारतीय न्याय संहिता सुधारणा विधेयक भारत राजपत्र मा. महामहिम राष्ट्रपती यांच्या स्वाक्षरीने दिनांक 25 डिसेंबर रोजी प्रकाशित झालेले आहे. हे सुधारणा विधेयक प्रकाशित झाल्यापासूनच याचा विरोध सुरु झाला आहे. या विरोधाचे प्रमुख कारण सोशल मीडियाद्वारे जाहीर केलेली अर्धवट माहिती आहे.यामुळे सर्व ड्रायव्हरच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अपघातानंतर ड्रायव्हर गाडी सोडून पळाल्यास १० लाख रुपये दंड व १० वर्षे कारावास. ड्रायवरने अपघात झाल्यावर जखमी व्यक्तीला दवाखान्यात किंवा पोलीस स्टेशनला पोहचविल्यास ५ लाख रुपये दंड व ५ वर्षे कारावास असे प्रावधान असून अपघातात कोणी मृत्युमुखी पडल्यास जामीन मिळणार नाही.परंतु अपघात झाल्यास जवळपास असलेले लोक ड्रायव्हरला बेदम मारहाण करतात त्यामुळे ड्रायव्हरला तिथे थांबणे शक्य होत नाही. मात्र, प्रकाशित राजपत्रामध्ये सर्व नियमांचा खुलासा झालेला नाही त्यामुळेच अनेक शंका निर्माण झालेल्या आहे. शासनाने या सर्व शंकाचे निरसन तात्काळ करावे.

जो पर्यंत शंकाचे समाधान होणार नाही तोपर्यंत हा तिढा सुटणे शक्य नाही. नागरिकांनी संयम पाळावा. प्रशासन, तेल विपणन कंपन्या डीलर व वाहतूकदार पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत यावर अमित गुप्ता यांनी भर दिला.

Latest Marathi News विदर्भातील पंपावर पेट्रोल साठा संपला, गॅसलाही चालक संपाचा फटका  Brought to You By : Bharat Live News Media.