मराठा आरक्षणप्रश्नी ‘ऑनलाईन चर्चा’ निष्फळ! जरांगे ‘२० जानेवारी’च्या अल्टीमेटमवर ठाम

पुढारी ऑनलाईन डेस्क : मराठा आरक्षणप्रश्नी आज (दि. २) जरांगे पाटील आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात ऑनलाईन संभाषण झाले. या संभाषणादरम्यान जरांगे पाटील हे सरसकट आरक्षण भुमिकेवर ठाम होते. संपूर्ण संभाषणानंतर आरक्षप्रश्नी चर्चा निष्फळ ठरली. या बैठकीतून कोणतीही सकारात्मक भुमिका दोन्ही बाजूकडून पहायला मिळाली नाही. संपूर्ण चर्चेनंतर फोनवरील हे संभाषण यापूर्वी झालेल्या विषयांवरच थांबवण्यात आले. … The post मराठा आरक्षणप्रश्नी ‘ऑनलाईन चर्चा’ निष्फळ! जरांगे ‘२० जानेवारी’च्या अल्टीमेटमवर ठाम appeared first on पुढारी.

मराठा आरक्षणप्रश्नी ‘ऑनलाईन चर्चा’ निष्फळ! जरांगे ‘२० जानेवारी’च्या अल्टीमेटमवर ठाम

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : मराठा आरक्षणप्रश्नी आज (दि. २) जरांगे पाटील आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात ऑनलाईन संभाषण झाले. या संभाषणादरम्यान जरांगे पाटील हे सरसकट आरक्षण भुमिकेवर ठाम होते. संपूर्ण संभाषणानंतर आरक्षप्रश्नी चर्चा निष्फळ ठरली. या बैठकीतून कोणतीही सकारात्मक भुमिका दोन्ही बाजूकडून पहायला मिळाली नाही. संपूर्ण चर्चेनंतर फोनवरील हे संभाषण यापूर्वी झालेल्या विषयांवरच थांबवण्यात आले. त्यामुळे जरांगे पाटील यांनी आपली भुमिका स्पष्ट आहे, सरकारने २० जानेवारीपर्यंत निर्णय घ्यावा असे सांगितले.
यावेळी बोलत असताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, सरकारची भुमिका कालही आणि आजही स्पष्ट आहे. मराठा समाजाला लवकरच आरक्षण मिळणार आहे. तसेच ५४ लाख नोंदी सापडल्या असल्याचेही साएम शिंदे यावेळी म्हणाले. त्याचबरोबर शांततेत आंदोलन करणाऱ्यांवर कारवाई केलेली नाही अशी माहिती देखील त्यांनी दिली.
आधीच्या बैठकीतील ४ शब्द पाळा अशी मागणी जरांगे यांनी बैठकीदरम्यान केली. ते म्हणाले की, सगेसोयरेंची मागणी मान्य करावी. २० जानेवारीला काहीही ऐकणार नाही. तसेच सरकारने ज्या नोंदी सापडल्याची माहिती दिली आहे त्या जुन्या नोंदी आहेत की नव्या असा सवालही केला. त्याचबरोबर आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यात यावेत अशी मागणीही केली.

Latest Marathi News मराठा आरक्षणप्रश्नी ‘ऑनलाईन चर्चा’ निष्फळ! जरांगे ‘२० जानेवारी’च्या अल्टीमेटमवर ठाम Brought to You By : Bharat Live News Media.