ChatGPT बनवणाऱ्या OpenAI कंपनीने सॅम ऑल्टमनला सीईओ पदावरून हटवले

पुढारी ऑनलाईन डेस्क : ChatGPT बनवणाऱ्या OpenAI कंपनीकडून एक मोठी बातमी समोर आली आहे. कंपनीने मुख्य कार्यकारी अधिकारी सॅम ऑल्टमन यांना पदावरून हटवले आहे. ओपनएआयचे अध्यक्ष ग्रेग ब्रॉकमन यांनीही कंपनीच्या या निर्णयाच्या निषेधार्थ आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. कंपनीने एका ब्लॉगमध्ये खुलासा केला आहे की ओपनएआयच्या बोर्डाला आता ऑल्टमनवर विश्वास राहिलेला नाही. त्याच्या नेतृत्व क्षमतेवर … The post ChatGPT बनवणाऱ्या OpenAI कंपनीने सॅम ऑल्टमनला सीईओ पदावरून हटवले appeared first on पुढारी.

ChatGPT बनवणाऱ्या OpenAI कंपनीने सॅम ऑल्टमनला सीईओ पदावरून हटवले

पुढारी ऑनलाईन डेस्क : ChatGPT बनवणाऱ्या OpenAI कंपनीकडून एक मोठी बातमी समोर आली आहे. कंपनीने मुख्य कार्यकारी अधिकारी सॅम ऑल्टमन यांना पदावरून हटवले आहे. ओपनएआयचे अध्यक्ष ग्रेग ब्रॉकमन यांनीही कंपनीच्या या निर्णयाच्या निषेधार्थ आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
कंपनीने एका ब्लॉगमध्ये खुलासा केला आहे की ओपनएआयच्या बोर्डाला आता ऑल्टमनवर विश्वास राहिलेला नाही. त्याच्या नेतृत्व क्षमतेवर बोर्डाला विश्वास नव्हता. बोर्ड सदस्य आणि सॅम यांच्यातील संवादाचा अभाव हे त्याचे प्रमुख कारण असल्याचे सांगितले जात आहे.
ऑल्टमन यांनी ट्विट केले
कंपनीच्या मुख्य तंत्रज्ञान अधिकारी मीरा मुराती आता सीईओ म्हणून कार्यभार स्वीकारतील. पदावरून हटवल्यानंतर ऑल्टमन यांनी ट्विट केले, त्यांनी लिहिले की, “मी ओपनएआयमध्ये जेवढा वेळ दिला तो खूप आवडला. कंपनीत प्रतिभावान लोकांसोबत काम करताना खूप मजा आली. राजीनामा हा परिवर्तनवादी निर्णय होता. आता मी काय करणार, यानंतर काय होईल ते नंतर सांगेन.”
ब्रॉकमनने सहकाऱ्यांना केला मेल
त्याचवेळी, अध्यक्षपदाचा राजीनामा देताना, ब्रॉकमनने आपल्या कंपनीच्या सर्व सहकाऱ्यांना एक मेल पाठवला, ज्यामध्ये त्यांनी म्हटले की मी तुम्हाला शुभेच्छा देतो. मला एक सुरक्षित कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तयार करायची होती ज्याचा समाजाला फायदा होऊ शकेल.
The post ChatGPT बनवणाऱ्या OpenAI कंपनीने सॅम ऑल्टमनला सीईओ पदावरून हटवले appeared first on पुढारी.

पुढारी ऑनलाईन डेस्क : ChatGPT बनवणाऱ्या OpenAI कंपनीकडून एक मोठी बातमी समोर आली आहे. कंपनीने मुख्य कार्यकारी अधिकारी सॅम ऑल्टमन यांना पदावरून हटवले आहे. ओपनएआयचे अध्यक्ष ग्रेग ब्रॉकमन यांनीही कंपनीच्या या निर्णयाच्या निषेधार्थ आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. कंपनीने एका ब्लॉगमध्ये खुलासा केला आहे की ओपनएआयच्या बोर्डाला आता ऑल्टमनवर विश्वास राहिलेला नाही. त्याच्या नेतृत्व क्षमतेवर …

The post ChatGPT बनवणाऱ्या OpenAI कंपनीने सॅम ऑल्टमनला सीईओ पदावरून हटवले appeared first on पुढारी.

Go to Source