परभणी : तरंगल शिवारातील शेतरस्ता खोदला: शेतकऱ्यांचा आमरण उपोषणाचा इशारा

पूर्णा, Bharat Live News Media वृत्तसेवा: पूर्णा तालुक्यातील पांगरा गावच्या तरंगल शिवारात असलेल्या आणि पूर्णा पांगरा मुख्य रोडपासून गट क्रमांक ५४, ५५, ५६, ५७ कडे जाणारा दहा फूट रुंदीचा जुना वहिवाटेचा शेतरस्ता खोदून मोठा नाला केला आहे. ५ नोव्हेंबर २०२३ रोजी गट क्रमांक ७३ व ७४ च्या शेतमालकांनी खोडसाळपणे संगनमत करुन बेकायदेशीररित्या खोल खोदून नाला काढून ब्लॉक केला आहे. Parbhani News
हा जुना शंभर वर्षापूर्वीचा रस्ता अचानक बंद केल्याने शेतक-यांनी ११ नोव्हेंबर २०२३ रोजी तहसिलदारांना तक्रार अर्ज देवून खुला करुन देण्याची मागणी केली होती. त्यावरुन तक्रारदार शेतक-यांनी वारंवार विनंत्या केल्यानंतर सदर खोदून टाकलेल्या रस्त्याची पाहणी करुन त्या ठिकाणी नंबरधुरा शेतरस्ता असल्याचे रस्ता बंद करणा-या ७३, ७४ गटाच्या शेतमालकास बोलावून त्यांना सदरील खोदलेला नाली रस्ता बुजवून देण्याची सुचना तलाठी व मंडळ अधिका-यांनी दिली होती. Parbhani News
परंतु, अद्याप रस्ता खुला करुन दिलाच नाही. पाहणी पंचनामा सादर करुनही तहसिलदार यांनी संबंधितांवर कोणतीही कार्यवाई केलेली नाही. परिणामी, गट क्रमांक ५४, ५५, ५६, ५७ मधील असंख्य शेतक-यांना शेतात जाणे येणे मुश्किल झाले आहे. ऊस रस्त्याअभावी शेतातच उभा ठेवण्याची वेळ आली आहे. येत्या सहा दिवसांत सदर रस्ता खुला न केल्यास आत्माराम ढोणे, उत्तमराव ढोणे, देविदास ढोणे, संतोष ढोणे, जळबाजी ढोणे, भानूदास ढोणे, ज्ञानदेव ढोणे, रामदास ढोणे, संदीप ढोणे खोदलेल्या रस्त्यावरच आमरण उपोषण करणार आहेत.
आमच्या आजोबा पणजोबापासून हा सार्वजनिक रहादारीचा मोठा रुंद शेत रस्ता होता. परंतू, मुद्दामहून हा चालू रस्ता खोदून बंद केला आहे. आता आम्ही शेती करायची की, गाव सोडून जायचे? याचे उत्तर तहसिलदार, जिल्हाधिकारी यांनी आम्हाला द्यावे. बंद केलेला रस्ता ताबडतोब खुला करुन द्यावा. नाहीतर आम्ही खोदलेल्या नालीत बसूनच उपोषण करणार आहोत.
आत्माराम नागोराव ढोणे, शिवार तरंगल, (रा. पांगरा लासीना, ता. पूर्णा)
हेही वाचा
परभणी : सभेसाठीच्या शिल्लक रक्कमेतून घेतली रुग्णवाहिका; सेलूतील मराठा बांधवांचा उपक्रम
परभणी : मानवत पालिकेच्या कारवाईत प्लस्टिक कॅरीबॅगचा ८३ किलो साठा जप्त, २३ हजाराचा दंड वसूल
Pune Crime News : खून करून फरार झालेल्या आरोपींना परभणीतून अटक
Latest Marathi News परभणी : तरंगल शिवारातील शेतरस्ता खोदला: शेतकऱ्यांचा आमरण उपोषणाचा इशारा Brought to You By : Bharat Live News Media.
