‘नायलॉन मांजा’ कळवा, 5000 मिळवा

नगर : पुढारी वृत्तसेवा :  शासनाने वापरास प्रतिबंध केलेल्या नायलॉन मांजा विक्रेत्यांवर महापालिका कठोर कारवाई करणार असून अशा विक्रेत्यांची गोपनीय माहिती देणार्‍यास महापालिका पाच हजार रुपयांचे रोख बक्षीस देणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. पंकज जावळे यांनी दिली. नायलॉन मांजामुळे मनुष्य व पक्ष्यांच्या जीवितास धोका निर्माण होतो. त्यामुळे नायलॉन मांजावर शासनाने प्रतिबंध घातले … The post ‘नायलॉन मांजा’ कळवा, 5000 मिळवा appeared first on पुढारी.

‘नायलॉन मांजा’ कळवा, 5000 मिळवा

नगर : Bharat Live News Media वृत्तसेवा :  शासनाने वापरास प्रतिबंध केलेल्या नायलॉन मांजा विक्रेत्यांवर महापालिका कठोर कारवाई करणार असून अशा विक्रेत्यांची गोपनीय माहिती देणार्‍यास महापालिका पाच हजार रुपयांचे रोख बक्षीस देणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. पंकज जावळे यांनी दिली. नायलॉन मांजामुळे मनुष्य व पक्ष्यांच्या जीवितास धोका निर्माण होतो. त्यामुळे नायलॉन मांजावर शासनाने प्रतिबंध घातले आहेत. त्या अनुषंगाने महापालिकेत बैठक घेऊन आयुक्त डॉ. जावळे अधिकार्‍यांना सक्त सूचना केल्या.
अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रदीप पठारे, उपायुक्त अजित निकत, सहायक आयुक्त सपना वसावा, स्वच्छता कक्षप्रमुख परीक्षित बीडकर, प्रसिद्धी विभागप्रमुख नजान, हरियालीचे सुरेश खामकर, हरिभूमीचे अभय ललवाणी यांच्यासह मनपाचे स्वच्छता निरीक्षक उपस्थित होते.
आयुक्त डॉ. जावळे म्हणाले, नायलॉन मांजा विक्री करणार्‍यावर महापालिकेच्या अधिकार्‍यांनी तत्काळ कारवाई करावी. दिरंगाई करणार्‍या अधिकार्‍यांचीही गय केली जाणार नाही. महापालिकेला प्रतिबंधित नायलॉन मांजा विक्री करणार्‍या विक्रेत्यांची माहिती 7588168672 या मोबाईल क्रमांकावर द्यावी. माहिती देणार्‍याचे नाव गुप्त ठेवण्यात येईल. त्याचबरोबर नागरिकांनी देखील जीवितास धोका निर्माण करणार्‍या नॉयलॉन मांजाचा वापर स्वतःहून टाळावा, असे आवाहन डॉ. जावळे यांनी केले आहे.
 
Latest Marathi News ‘नायलॉन मांजा’ कळवा, 5000 मिळवा Brought to You By : Bharat Live News Media.