कोल्हापूर: सरवडे येथे भीषण आगीत घर जळून खाक

सरवडे, पुढारी वृत्तसेवा : येथील शामराव महादेव केसरकर यांच्या उंदरवाडी हद्दीत असलेल्या राहत्या घराला विजेच्या शाॅर्टसर्किटने आग लागून संसार साहित्यासह घर जळून खाक झाले. यामध्ये सुमारे २० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. ही घटना सोमवारी रात्री दहाच्या सुमारास घडली. पहाटेपर्यंत आग विझवण्याचे काम सुरू होते. शेतकरी कुटुंबाचे संपूर्ण साहित्य जळाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. रात्री … The post कोल्हापूर: सरवडे येथे भीषण आगीत घर जळून खाक appeared first on पुढारी.

कोल्हापूर: सरवडे येथे भीषण आगीत घर जळून खाक

सरवडे, Bharat Live News Media वृत्तसेवा : येथील शामराव महादेव केसरकर यांच्या उंदरवाडी हद्दीत असलेल्या राहत्या घराला विजेच्या शाॅर्टसर्किटने आग लागून संसार साहित्यासह घर जळून खाक झाले. यामध्ये सुमारे २० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. ही घटना सोमवारी रात्री दहाच्या सुमारास घडली. पहाटेपर्यंत आग विझवण्याचे काम सुरू होते. शेतकरी कुटुंबाचे संपूर्ण साहित्य जळाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
रात्री दहाच्या सुमारास अचानक शाॅर्टसर्किट होवून घरात आग लागली. यावेळी घरात कोणी नव्हते. मात्र, बाहेर गेलेले शामराव केसरकर परत आल्यानंतर त्यांना आग लागल्याचे लक्षात आले. परंतु, आगीचे रूप रौद्र असल्याने संपूर्ण घराला आगीने वेढले. त्यामुळे कोणाला काही करता येईना. बिद्री, हमीदवाडा साखर कारखाना व मुरगूड नगरपालिकेचे अग्निशमन बंब तत्काळ दाखल झाले. परंतु, अगोदरच घरातील वैरण, जळण, धान्य, जनावरांचे खाद्य, रोख रक्कम यासह घरातील संपूर्ण साहित्य जळून नष्ट झाले. ग्रामस्थ, युवकांनी आग आटोक्यात आणण्यासाठी मदत केली. घटनास्थळी सरपंच, तलाठी, ग्रामसेवक यांनी भेट देऊन नुकसानीचा पंचनामा केला आहे.
हेही वाचा 

कोल्हापूर : प्राणघातक हल्ल्यातील जखमी बेकरी व्यावसायिकाचा मृत्यू
कोल्हापूर : प्रत्येक महाविद्यालय घेणार 5 गावे दत्तक; पर्यावरण संवर्धनासाठी शिवाजी विद्यापीठाचा उपक्रम
कोल्हापूर : पेट्रोल पंप बंद राहणार असल्याच्या अफवेने पंपांवर लागल्या रांगा

Latest Marathi News कोल्हापूर: सरवडे येथे भीषण आगीत घर जळून खाक Brought to You By : Bharat Live News Media.