इराच्या घरी लग्नाची लगबग, मराठी लूकमध्ये किरण राव..

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : इरा खान आणि नुपूर शिखरे खूप दिवसांपासून एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये आहेत. दोघांचा जवळपास वर्षभरापूर्वी साखरपुडा झाला होता. (Ira Khan Wedding) आता हे कपल लवकरच लग्नाच्या बंधनात अडकायला तयार आहे. दोघांच्याही घरी लग्नाचे विधी सुरु झाले आहेत. आता एक नवा व्हिडिओ व्हायरल झाला असून या व्हिडिओमध्ये आमिरची एक्स पत्नी रीना दत्त आणि किरण राव मराठमोळ्या लूकमध्ये दिसत आहेत. या व्हिडिओमध्ये नुपूर शिखरेदेखील लाल कुर्तामध्ये दिसत आहे. (Ira Khan Wedding)
संबंधित बातम्या –
Arjun Kapoor : अर्जुनने कपूरचा नवीन टॅटू, सोबत नवा उत्साह (Video)
Allu Arjun Pushpa 2 – अल्लू अर्जुनचा सीक्वेल सिंघम रिर्टन्सशी क्लॅश होणार?
Salaar Box Office Collection : प्रभासच्या ‘सालार’ ची दुसऱ्या आठड्यातही धुमाकूळ
दोघे ३ जानेवारी रोजी लग्नाच्या बंधनात अडकणार आहेत. खान परिवारातही लग्नाच्या विधी सुरु आहेत. आज इराची हळद आणि मेहंदीचा कार्यक्रम आहे. आमिर खानच्या घरी पाहुण्यांचे येणे सुरु झाले आहे.
View this post on Instagram
A post shared by Varinder Chawla (@varindertchawla)
आमिरच्या दोन्ही पत्नी लग्नाच्या तयारीत लागल्या आहेत. इराची आई रीना दत्त आणि ट्रॅडिशनल आऊटफिटमध्ये दिसत आहे. यावेळी आमिरची दुसरी पत्नी किरण रावदेखील मराठी लूकमध्ये दिसली. इराचा लूक अद्याप समोर आलेला नाही. आमिर खान नेहमीप्रमाणे कॅज्युअल लूकमध्ये दिसतो. रीना दत्तने हिरव्या रंगाची नऊवारी साडी नेसलीय तर किरण रावने जांभळ्या रंगाची नऊवारी साडी नेसलीय.
View this post on Instagram
A post shared by Ira Khan (@khan.ira)
Latest Marathi News इराच्या घरी लग्नाची लगबग, मराठी लूकमध्ये किरण राव.. Brought to You By : Bharat Live News Media.
