शेवगावात 79 गावांची नजर आणेवारी 50 च्या पुढे

शेवगाव तालुका : Bharat Live News Media वृत्तसेवा : रब्बी पिकांची नजर अंदाज आणेवारी पन्नास पैशाच्या पुढे जाहीर करण्यात आली आहे. शेवगाव तालुका दुष्काळी जाहीर झाला असल्याने सुधारित व अंतिम आणेवारीत बदल होण्याची शक्यता आहे. दरम्यान, शेतकर्यांनो घाबरू नका, पुढील आणेवारीत बदल करण्यास भाग पाडू, असा विश्वास स्वाभिमानी शेतकरी संघटनेने शेतकर्यांना दिला आहे. तालुक्यातील 79 रब्बी गावांतील रब्बी पिकांची सन 2023- 24 ची नजर अंदाज आणेवारी पन्नास पैशापेक्षा जास्त जाहीर झाली आहे. पावसाचा खंड पडल्याने खरीप पिके वाया गेली. त्यामुळे त्याची सुधारित व अंतिम आणेवारी पन्नास पैशापेक्षा कमी जाहीर झाली होती.
खरीप हंगामात खरीपाच्या 34 गावांत तसेच रब्बीच्या 79 गावांत दोन तृतांशपेक्षा जास्त खरीप पिकांच्या पेरण्या झाल्या होत्या. ही सर्व पिके वाया गेल्याने शासनाने दुष्काळ जाहीर केला. रब्बी पिकांची अवस्थाही बिकट आहे. यंदा कमी क्षेत्रावर रब्बीची पेरणी झाली आहे. त्यात पाणी पातळी खालावत चालल्याने धोका वाढत आहे. नजर अंदाज आणेवारी जाहीर झालेली गावे अशी ः वरुर बुद्रुक, वरुर खुर्द, चापडगाव, प्रभूवाडगाव, ठाकूर पिंपळगाव (51 पैसे), शेवगाव, सुलतानपूर खुर्द, शहजापूर, आखेगाव ति., आखेगाव डो.,भगूर, गदेवाडी, कुरुडगाव, वडुले बुद्रूक, (52 पैसे), अमरापूर, खरडगाव, मुर्शदपूर, तळणी, दहिगाव शे, रावतळे, गायकवाड जळगाव, खामगाव, सामनगाव, (53 पैसे), लाखेफळ, खुंटेफळ, बालमटाकळी, घोटण, सोनविहीर, भायगाव, जोहरापूर, हिंगणगाव-ने, मळेगाव-शे, लोळेगाव, बर्हाणपूर (54 पैसे), दादेगाव, अंतरवाली बुद्रुक, जुने दहिफळ, बोडखे, अंतरवाली खुर्द-ने, लखमापुरी, देवटाकळी, भावी निमगाव, भातकुडगाव, मजलेशहर, आव्हाणे खुर्द, आव्हाणे बुद्रुक, नांदूर विहिरे (55 पैसे), एरंडगाव भागवत, ढोरहिंगणी, ताजनापूर, खानापूर, कर्हेटाकळी, हातगाव, खामपिंप्री नवीन, अंत्रे खामपिंप्री जुनी, बक्तरपूर, शहरटाकळी, सुलतानपूर बुद्रूक, मलकापुर, गरडवाडी, आपेगाव, आखतवाडे, वडुले खुर्द, निंबे नांदूर (56 पैसे), कर्जत खुर्द, विजयपूर, पिंगेवाडी, कांबी, खडके,मडके, दहिगाव-ने, घेवरी, देवळाणे, वाघोली, ढोरसडे, रांजणी, ढोरजळगाव-शे, ढोरजळगाव-ने (57 पैसे) व मुंगी ( 58 पैसे).
शेतकर्यांनो घाबरू नका
याबाबत शेतकर्यांनो घाबरू नका, पुढील आणेवारी पन्नास पैशापेक्षा कमी जाहीर करण्यास भाग पाडू, वेळप्रसंगी त्यासाठी रस्त्यावर संघर्ष करण्याची वेळ आली तरी हटणार नाही, असा दिलासा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला.
बदल होण्याची अपेक्षा
रब्बीची जाहीर झालेली नजर अंदाज आणेवारी चुकीची आहे. मात्र, यामुळे शेतकर्यांत संताप निर्माण झाला आहे. सुधारित व अंतिम आणेवारीत बदल होण्याची अपेक्षा आहे.
Latest Marathi News शेवगावात 79 गावांची नजर आणेवारी 50 च्या पुढे Brought to You By : Bharat Live News Media.
