हप्ता घेणारा लोकप्रतिनिधी कोण? चर्चेला उधाण

पाथर्डी तालुका : पुढारी वृत्तसेवा : एका ठेकेदाराने शहरातील नवी पेठ येथील रस्त्याच्या कामाच्या ठिकाणी काही तरूणांना पाठवत, तुम्ही या कामाचा हप्ता हे काम मंजूर करणार्‍या लोकप्रतिनिधींना का दिला नाही? असे म्हणत हे काम बंद पाडले. त्यामुळे हा लोकप्रतिनिधी कोण? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. पाथर्डी शहरात याची चांगलीच चर्चा रंगू लागली आहे. दोन ठेकेदारांच्या … The post हप्ता घेणारा लोकप्रतिनिधी कोण? चर्चेला उधाण appeared first on पुढारी.

हप्ता घेणारा लोकप्रतिनिधी कोण? चर्चेला उधाण

पाथर्डी तालुका : Bharat Live News Media वृत्तसेवा : एका ठेकेदाराने शहरातील नवी पेठ येथील रस्त्याच्या कामाच्या ठिकाणी काही तरूणांना पाठवत, तुम्ही या कामाचा हप्ता हे काम मंजूर करणार्‍या लोकप्रतिनिधींना का दिला नाही? असे म्हणत हे काम बंद पाडले. त्यामुळे हा लोकप्रतिनिधी कोण? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. पाथर्डी शहरात याची चांगलीच चर्चा रंगू लागली आहे. दोन ठेकेदारांच्या वादात शहराच्या मुख्य भागात चालू असलेल्या नवी पेठेतील रस्त्याचे काम दोन दिवसांपासून बंद पडले आहे. त्यामुळे या रस्त्यालगत असलेल्या व्यावसायिकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. नवी पेठ हा भाग शहराचा मुख्य भाग असून, या भागात असलेल्या निर्‍हाळी नाट्यगृह ते अष्टवाडा या भागाला जोडणार्‍या रस्त्याचे काम सध्या चालू आहे.
सुमारे पंधरा लाख रूपये खर्चाच्या या कामाचा ठेका शेवगाव येथील एका ठेकेदाराला देण्यात आला आहे. सध्या हे काम या ठेकेदाराच्या वतीने शहरातीलच एक ठेकेदार करत आहे. मागील आठवड्यात या रस्त्याचे काम सुरू करण्यात आले. हे काम करताना अगोदर या ठिकाणी जो रस्ता होता, तो पूर्णपणे खोदण्यात येऊन त्यावर खडी टाकण्यात आली आहे. या ठिकाणी वाहनांची मोठ्या प्रमाणात ये-जा चालू असल्याने, तसेच वाहने सुद्धा मोठ्या प्रमाणात येत ात. त्यामुळे संबंधित ठेकेदाराने या रस्त्याच्या भोवती लाकडी बॅरिकेट उभारत हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करत, रस्त्याचे काम मागील आठवड्यात सुरू केले होते. रविवारी एका ठेकादाराने काही तरूण पाठवून, तू काम मंजूर करणार्‍या लोकप्रतिनिधीला हप्ता का दिला नाही? असे म्हणत हे काम बंद ठेव, काम करू नको, असे सांगितले. त्यामुळे या ठेकेदाराकडून काम बंद ठेवण्यात आले आहे. दोन दिवसांपासून या रस्त्याचे काम बंद असल्याने नागरिकांना मोठी कसरत करावी लागत आहे. नेमके आलेले तरूण कोणाचे होते? तो लोकप्रतिनिधी कोण? लोकप्रतिनिधींचा हप्ता कसला? असे अनेक प्रश्न या वादामुळे आता चर्चेला येऊ लागले आहेत.
या दोन्ही ठेकेदारांमधील वाद न मिटल्याने पादचारी, व्यावसायिक यांची मोठी अडचण झाली आहे. या परिसरात भांडे विक्रेते, दवाखाने, फर्निचर, मेडिकल, स्टेशनरी व सराफ व्यावसायिकांची दुकानदारी अडचणीत येऊन व्यवसायावर परिणाम होत आहे. ग्राहकांची मोठी वर्दळ या ठिकाणी असते. येथील परिसरातील बंद पडलेले रस्त्याचे काम त्वरित सुरू करावे आणि व्यावसायिक व ग्राहकांची अडचण दूर करावी, अशीच अपेक्षा लोकांची आहे.
Latest Marathi News हप्ता घेणारा लोकप्रतिनिधी कोण? चर्चेला उधाण Brought to You By : Bharat Live News Media.