उपसरपंचपद मिळविण्यासाठी सोशल मीडियावर चढाओढ
![]()
बारामती : Bharat Live News Media वृत्तसेवा : बारामती तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असणार्या वडगाव निंबाळकर येथे उपसरपंचपद मिळविण्यासाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून आता रस्सीखेच सुरू झाली आहे. गावात विकासकामांचा धडाका सुरू असताना सदस्यांकडून सुरू झालेली ही पोस्टबाजी गावात चर्चेचा विषय ठरली आहे. उपसरपंचपद पटकावण्याची रस्सीखेच यापूर्वी फक्त सदस्यांपुरती मर्यादित होती. एका सदस्याने आता थेट सोशल मीडियावर आव्हान देत उपसरपंचपदाच्या आड कोण येतेय याची पोस्ट केली. त्यामुळे गावात तो चर्चेचा विषय झाला आहे. सरपंच-उपसरपंचपदाची खांदेपालट होईल, अशी चर्चा ग्रामस्थांमध्ये गेली अनेक महिन्यांपासून आहे.
उपसरपंचपद मिळविण्यासाठी काहींचा खटाटोप सुरू आहे. त्यातून काही सदस्य आता थेट सोशल मीडियावर पोस्ट टाकू लागले आहेत. याचा परिणाम गावच्या विकासकामांवर, ग्रामपंचायतीच्या कारभारावर होऊ नये, अशी अपेक्षा ग्रामस्थ व्यक्त करत आहेत. सोशल मीडिया हा प्रत्येकाला व्यक्त होण्याचा सोयीस्कर प्लॅटफॉर्म आहे. परंतु पदासाठी जाती-पातीवर आधारित पोस्ट गावातील शांतता भंग करू शकते. राजकारणासाठी कायदा व सुव्यवस्था बिघडवू पाहाणारी विघातक प्रवृत्ती पोलिसांनी ठेचून काढली पाहिजे अशा भावना व्यक्त होत आहेत.
Latest Marathi News उपसरपंचपद मिळविण्यासाठी सोशल मीडियावर चढाओढ Brought to You By : Bharat Live News Media.
