सात टन चिकन, दीड टन मटनावर खवय्यांचा ताव

मंचर : पुढारी वृत्तसेवा : आंबेगाव तालुक्यात रविवारी (दि. 31 डिसेंबर) सकाळपासूनच चिकन, मटन दुकानावर मांसाहार खरेदीसाठी शौकिनांनी गर्दी केली. तब्बल 400 चिकन आणि 15 मटन दुकानांमध्ये मार्गशीर्ष महिना असूनही सात टन चिकन आणि दीड टन मटनावर खवय्यांनी ताव मारल्याची माहिती चिकन आणि मटन व्यावसायिक संघटनेने दिली. कळंब, मंचर, एकलहरे, अवसरी, घोडेगाव, महाळुंगे, निरगुडसर, पारगाव … The post सात टन चिकन, दीड टन मटनावर खवय्यांचा ताव appeared first on पुढारी.

सात टन चिकन, दीड टन मटनावर खवय्यांचा ताव

मंचर : Bharat Live News Media वृत्तसेवा : आंबेगाव तालुक्यात रविवारी (दि. 31 डिसेंबर) सकाळपासूनच चिकन, मटन दुकानावर मांसाहार खरेदीसाठी शौकिनांनी गर्दी केली. तब्बल 400 चिकन आणि 15 मटन दुकानांमध्ये मार्गशीर्ष महिना असूनही सात टन चिकन आणि दीड टन मटनावर खवय्यांनी ताव मारल्याची माहिती चिकन आणि मटन व्यावसायिक संघटनेने दिली. कळंब, मंचर, एकलहरे, अवसरी, घोडेगाव, महाळुंगे, निरगुडसर, पारगाव यासारख्या बहुतेक गावांत सकाळपासूनच चिकन, मटन, मासे शौकिनांनी मोठ्या प्रमाणावर नववर्षाच्या स्वागतासाठी घरगुती आणि शेतीवर पार्ट्या करण्यासाठी चिकन, मटन खरेदी करण्यासाठी गर्दी केल्याचे दिसून आले.
मासळी बाजारातही मोठ्या प्रमाणावर उलाढाल झाल्याचे मच्छी विक्रेत्यांकडून सांगण्यात आले. चिकन 160 रुपये किलो दराप्रमाणे विकले गेले. तसेच मटनाचे दर 660 ते 700 रुपये किलो होते. याउलट अंड्याचे बाजारभाव वाढल्याने अंडी प्रतिडझन 90 रुपयेप्रमाणे विक्री झाल्याचे दिसून आले. मांसाहार विकण्यासाठी मार्गशीर्ष महिन्याचा फारसा परिणाम 31 डिसेंबर रोजी जाणवला नसल्याचे दिसून आले, अशी माहिती कळंब येथील ख्वाजा गरीब नवाज चिकन अ‍ॅण्ड एग्ज सेंटरचे विक्रेते इसाक शेख आणि घोडेगाव येथील ब—ॉयलर कोंबडीचे होलसेल व्यापारी व चिकन सेंटरचे विक्रेते जावेद मिस्त्री, फिरोज मिस्त्री तसेच एकलहरे येथील बकरीचे व्यापारी व मटन शॉपचे विक्रेते शेखर कांबळे यांनी दिली.
सायंकाळी हॉटेलमध्ये मोठी गर्दी
सायंकाळी हॉटेलमध्ये प्रचंड प्रमाणात गर्दी जाणवली. 31 डिसेंबरची पार्टी साजरी करण्यासाठी हॉटेलमध्ये नागरिकांनी मोठी गर्दी केली होती, अशी माहिती कळंब येथील तिरंगा धाब्याचे उद्योजक नितीन भालेराव, सचिन भालेराव, नीलेश भालेराव,आप्पाचा धाब्याचे उद्योजक सोमनाथ भालेराव तसेच एकलहरे येथील मांसाहारी हॉटेल व्यावसायिक संतोष डोके,अर्जुन डोके, नीलेश डोके आणि संदेश गाडे यांनी दिली.
Latest Marathi News सात टन चिकन, दीड टन मटनावर खवय्यांचा ताव Brought to You By : Bharat Live News Media.