जपान भूकंप दुर्घटनेतील मृतांचा आकडा ४८ वर

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क: नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी जपानवर संकट ओढावले. २०२४ च्या पहिल्या दिवशी जपानमध्ये १५५ जोरदार भूकंपाचे धक्के बसले. या भूकंप दुर्घटना मालिकेत सुमारे ४८ लोकांचा मृत्यू झाला आहे, असे वृत्त जपान सरकारच्या अधिकृत वृत्तसंस्था NHK चा हवाला देत, ‘एनडीटीव्ही’ने वृत्त दिले आहे. (Japan Earthquake)
नव्या वर्षाच्या पहिला दिवशी जपानला भूकंपाचे जोरदार धक्के बसले. सोमवारपासून बसलेल्या १५५ धक्क्यांमुळे सुनामीच्या लाटांनी जपानसहित कोरिया आणि रशियालाही धडका दिल्या. या भूकंपात आतापर्यंत ४८ जणांचा बळी गेला असून, शेकडो जखमी झाले आहेत. हजारो घरांची पडझड झाली असून, काही हजार लोक अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान येथील व्यवस्था विस्कळीत झाल्याने सुमारे 33,000 कुटुंबे वीजविना राहिली. देशभरातील अनेक महत्त्वाचे मार्ग, प्रमुख महामार्गांसह, कार्यान्वित नसल्यामुळे वैद्यकीय आणि लष्करी जवानांना बचाव सेवांमध्ये अडचणी येत आहेत, असेही वृत्तात म्हटले आहे. (Japan Earthquake)
राजधानी टोकियोपासून सुमारे ३०० कि.मी. (१९० मैल) अंतरावरील नोटो द्वीपकल्पाजवळ सोमवारी झालेल्या ७.६ तीव्रतेच्या शक्तिशाली भूकंपानंतर जपानने संपूर्ण पश्चिम किनारपट्टीवर त्सुनामीचा इशारा जारी केला आहे. इशिकावा येथील नोटोच्या किनारपट्टीवर पाच मीटर उंच लाटा उसळल्या असून, नैसर्गिक आपत्तीमुळे ३३ हजारांहून अधिक घरांतील वीज आणि पाणीपुरवठा खंडित झाला आहे. प्रमुख महामार्गांसह देशभरातील अनेक महत्त्वाचे मार्ग बंद करण्यात आले आहेत, ज्यामुळे डॉक्टर आणि लष्करी जवानांना बचाव सेवा प्रदान करण्यात अडचण येत आहे. सोमवारपासून किमान १५५ भूकंपाचे धक्के बसले आहेत, ज्यात सुरूवातीला ७.६ रिश्टर स्केल तीव्रवतेचे होते, त्यानंतर ६ रिश्टर स्केल तीव्रतेचे धक्के बसले. (Japan Earthquake)
हेही वाचा:
Japan Airlines Fire : ३०० हून अधिक प्रवाशी असलेल्या जपान एअरलाइन्सच्या विमानाला हानेडा विमानतळावर भीषण आग
Japan Earthquake : भूकंपाच्या १५५ धक्क्यांनी जपानमध्ये मोठी जीवितहानी; १२ ठार
Japan earthquakes | २० भूकंपाच्या धक्क्यांनी जपान हादरले, ५ फूट उंच त्सुनामीच्या लाटा, रस्ते उखडले
Earthquake in Japan | जपानचा किनारी भाग भूकंपाने हादरला, रिश्टर स्केलवर ६.३ तीव्रता
Latest Marathi News जपान भूकंप दुर्घटनेतील मृतांचा आकडा ४८ वर Brought to You By : Bharat Live News Media.
