शिवरायांच्या सर्वात उंच पुतळ्याचे 12 रोजी भूमिपूजन

 जुन्नर : पुढारी वृत्तसेवा : हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती श्रीशिवाजी महाराज यांचा जगातील सर्वात उंच पुतळा व सर्वात उंच भगवा स्वराज्य ध्वज या शिवकार्याचा भूमिपूजन सोहळा राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंतीदिनी शुक्रवारी (दि. 12 ) होणार असल्याची माहिती श्रीमंत योगी सुवर्णस्मारक ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी आमदार शरद सोनवणे यांनी गोद्रे (ता. जुन्नर) येथे … The post शिवरायांच्या सर्वात उंच पुतळ्याचे 12 रोजी भूमिपूजन appeared first on पुढारी.

शिवरायांच्या सर्वात उंच पुतळ्याचे 12 रोजी भूमिपूजन

 जुन्नर : Bharat Live News Media वृत्तसेवा : हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती श्रीशिवाजी महाराज यांचा जगातील सर्वात उंच पुतळा व सर्वात उंच भगवा स्वराज्य ध्वज या शिवकार्याचा भूमिपूजन सोहळा राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंतीदिनी शुक्रवारी (दि. 12 ) होणार असल्याची माहिती श्रीमंत योगी सुवर्णस्मारक ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी आमदार शरद सोनवणे यांनी गोद्रे (ता. जुन्नर) येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. माजी नगरसेवक अविनाश करडिले, शाम खोत, माजी उपसरपंच प्रदीप चाळक, माजी सरपंच प्रदीप देवकर, संतोष वाघ, दर्शन फुलपगार, मनोज शिंदे, विकास राऊत, गोद्रेच्या सरपंच अनिता रेंगडे, भिमाजी उतळे, दिलीप गायकवाड, रमेश रेंगडे आदींसह शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
संबंधित बातम्या :

Japan Airlines Fire : ३०० हून अधिक प्रवाशी असलेल्या जपान एअरलाइन्सच्या विमानाला हानेडा विमानतळावर भीषण आग
आम्ही सहा जागांवर स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार : राजू शेट्टी
Nashik News : मनमाडच्या पेट्रोल-डिजेल टॅंकर चालकांचा संप अखेर मागे

गोद्रे येथे सुमारे 25 एकर जागेत हा प्रकल्प उभारण्याचा संकल्प श्रीमंतयोगी सुवर्ण स्मारक ट्रस्टच्या वतीने करण्यात आला आहे. खासदार संभाजीराजे छत्रपती (कोल्हापूर) यांच्या हस्ते या पुतळ्याच्या जागेचे शुक्रवारी भूमिपूजन होणार आहे. या वेळी 51 ब—ह्मवृंदाच्या उपस्थितीत विधिवत धार्मकि कार्यक्रम होतील. गोद्रे येथे शिवरायांचे सुवर्णमंदिर निर्माण करण्यात येणार असून त्यात सोन्याचे सिंहासन, सोन्याची मुर्ती, शिवरायांचे चरित्र लेझर शो व संग्रहालय असेल. येथे भोजनालय व्यवस्थाही असेल. तीन वर्षांत हा प्रकल्प पूर्ण केला जाईल. यामध्ये सर्वांनी आर्थकि योगदान देण्याचे आवाहन शरद सोनवणे यांनी केले.
सर्वात उंच भगवा स्वराज्य ध्वज उभारणार
250 फूट डोंगरावर 50 फूट चबुतरा व त्यावर 111 फूट उंचीचा शिवरायांचा पुतळा ब—ांझ धातूमध्ये बसविण्यात येणार आहे. या पुतळ्याचे आयुष्य 500 वर्षांचे असेल. पुतळ्याची निर्मतिी स्वदेशी असून वर्षभरात स्थापना केली जाईल. तसेच जगातील सर्वात उंच भगवा स्वराज्य ध्वज पुतळ्याच्या मागे बसविण्यात येणार आहे.
जुन्नर तालुक्यातील 80 हजार घरांमध्ये निमंत्रण
जुन्नर तालुक्यातील 80 हजार घरांमध्ये या सोहळ्याचे निमंत्रण देण्यात येईल. राज्यातील सर्व खासदार व आमदार तसेच तालुक्यातील सर्व ग्रामपंचायती, सरपंच, ग्रा. पं. सदस्य यांनाही निमंत्रण देण्यात येणार आहे.
Latest Marathi News शिवरायांच्या सर्वात उंच पुतळ्याचे 12 रोजी भूमिपूजन Brought to You By : Bharat Live News Media.