वाहन चालकांचा संप सुरू राहिल्यास बसचे नियोजन कोलमडणार

जळगाव : पुढारी वृत्तसेवा ; केंद्र सरकारने प्रस्तावित केलेल्या हिट अँड रन या कायद्याच्या विरोधामध्ये वाहन चालकांनी एक तारखेपासून आंदोलन सुरू केले आहे. यामुळे डीजेल वाहणारे व अत्यावश्यक वस्तू वाहतूक करणारी वाहने रस्त्यावर किंवा ट्रान्सपोर्ट भागात उभी आहे. याचा फटका बस वाहतुकीलाही बसण्याची चिन्हे दिसू लागलेली आहे. दोन तारखेला पुरेल इतकेच डिझेल जिल्ह्याच्या बस स्थानकात … The post वाहन चालकांचा संप सुरू राहिल्यास बसचे नियोजन कोलमडणार appeared first on पुढारी.

वाहन चालकांचा संप सुरू राहिल्यास बसचे नियोजन कोलमडणार

जळगाव : Bharat Live News Media वृत्तसेवा ; केंद्र सरकारने प्रस्तावित केलेल्या हिट अँड रन या कायद्याच्या विरोधामध्ये वाहन चालकांनी एक तारखेपासून आंदोलन सुरू केले आहे. यामुळे डीजेल वाहणारे व अत्यावश्यक वस्तू वाहतूक करणारी वाहने रस्त्यावर किंवा ट्रान्सपोर्ट भागात उभी आहे. याचा फटका बस वाहतुकीलाही बसण्याची चिन्हे दिसू लागलेली आहे. दोन तारखेला पुरेल इतकेच डिझेल जिल्ह्याच्या बस स्थानकात शिल्लक असल्याची माहिती विभागणी यंत्र भगवान जानभोर यांनी सागितले.
या आंदोलनामुळे डिझेल व अन्यत्र अत्यावश्यक वस्तूंचा वाहने रस्त्याच्या कडेला उभी राहिलेली आहे. त्यामुळे पेट्रोल पंपावर नागरिकांनी सकाळपासून गर्दी केली आहे. याचा फटका जिल्ह्यातील अनेक पेट्रोल पंपावरील पेट्रोल संपले आहे. ग्रामीण भागाची वाहिनी म्हणून ओळख असलेली बसलाही याचा फटका बसण्याची शक्यता आहे.
याबाबत विभागणी यंत्र यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, 2 तारखेला वाहनांना पुरेल इतके डिझेल आहे. काही ठिकाणी समस्या निर्माण होऊ शकते. त्यामुळे लोकल ठिकाणी बस सेवा सुरळीत राहील अशी माहिती विभागीय नियंत्रण भगवान जानभोर यांनी दिली. तर आकाशवाणी चौकामध्ये क्रांतिकारी ड्रायव्हर कामगार संघटनेतर्फे सकाळी 11 ते 12 वाजेपर्यंत रास्ता रोको आंदोलन व केंद्राने प्रस्तावित केलेले कायदा रद्द करण्याची मागणी करण्यात आली.
हेही वाचा :

कांदा पिकावर मावा, करपा रोगांचा प्रादुर्भाव
Sangli News : खानापुरात शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र करण्याचे उपमुख्यमंत्र्यांचे आदेश

 
 
Latest Marathi News वाहन चालकांचा संप सुरू राहिल्यास बसचे नियोजन कोलमडणार Brought to You By : Bharat Live News Media.