मनमाडच्या पेट्रोल-डिजेल टॅंकर चालकांचा संप अखेर मागे

नाशिक : Bharat Live News Media ऑनलाइन डेस्क; नवीन मोटार वाहन कायद्याविरोधात मनमाडच्या इंधन कंपन्यांमधून धावणाऱ्या टॅंकर व ट्रकचालंकानी पुकारलेला संप मागे घेतला आहे. जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या शिष्टाईनंतर हा संप मागे घेण्यात आला आहे.
टॅंकर चालकांच्या संपामुळे जिल्ह्यातील पेट्रोल पंपांना होणार इंधन पुरवठा विस्कळीत झाला. पेट्रोल पंपावर नागरिकांनी मोठमोठ्या रांगा लावल्या. यामुळे हा संप मागे घेतला जावा म्हणून प्रयत्न सुरु होते. त्यासाठी आज जिल्हाधिकारी जलज शर्मा हे मनमाड येथे गेले होते. पेट्रोल आणि डिझेल ही जीवनावश्यक बाब असून संप मागे घेण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केल्यानंतर त्यांच्या मागणीला यश आले. यावेळी टँकर चालकांनी संपातून माघार घेण्याची तयारी दर्शवली. त्यामुळे आता मनमाड डेपोतून टँकर रवाना होणार आहे.
Latest Marathi News मनमाडच्या पेट्रोल-डिजेल टॅंकर चालकांचा संप अखेर मागे Brought to You By : Bharat Live News Media.
