घोडेगावच्या हिंदकेसरी शर्यतीत धावले 365 बैलगाडे

मंचर : Bharat Live News Media वृत्तसेवा : घोडेगाव (ता. आंबेगाव) येथे सद्गुरू सेवा मंडळाने श्रीदत्तजयंतीनिमित्त हिंदकेसरी बैलगाडा स्पर्धा आयोजित केल्या होत्या. या स्पर्धा दोन दिवस पार पडल्या. यामध्ये 365 स्पर्धकांनी भाग घेतल्याची माहिती सद्गुरू सेवा मंडळाचे अध्यक्ष कैलासबुवा काळे यांनी दिली. स्पर्धेचे हे 45 वे वर्ष होते. स्पर्धेत आप्पाशेठ साकोरे, बबनशेठ रामशेठ शेलार व ज्ञानेश्वर चव्हाण यांनी घाटाचा राजा व यात्रेतील आकर्षक बारी सागर गायकवाड यांनी बहुमान पटकाविला. प्रथम क्रमाकांत 101 बैलगाडे आले. फळीफोडचा बहुमान जितेंद्र मालुंजे व अक्षय मुळूक यांनी पटकाविला. द्वितीय क्रमांकात 104 बैलगाडे आले.
फळीफोडचा बहुमान शाम खंडू गव्हाणे व बबन तोत्रे यांनी पटकाविला. तृतीय क्रमाकांत 63 बैलगाडे आले. फळीफोडचा बहुमान सुदाम यशवंत पारधी व अक्षय रवींद्र ढोले यांनी पटकाविला. चतुर्थ क्रमाकांत 24 गाडे आले. फळीफोडचा बहुमान युवराज शिंदे व राजेंद्र नवले यांनी पटकावला. यात्रा यशस्वी होण्यासाठी विनोद कासार, सत्यवान घोडेकर, खंडू शेटे, हरिश्चंद्र घोडेकर, संदीप काळे, सुनील इंदोरे, गणेश घोडेकर, गणेश झोडगे, ज्ञानेश्वर काळे, सुभाष मावळे, शिवाजी घोडेकर, विनायक भागवत, पिंटू शेटे, राजेंद्र शेटे, गोविंद काळे, अभिजित काळे, स्वप्नील घोडेकर यांनी सहकार्य केले.
यात्रेस माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, भीमाशंकर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे पाटील, कुलस्वामी पतसंस्थेचे अध्यक्ष शंकरशेठ पिंगळे यांनी भेट दिली. बैलगाड्याचे सेकंद मोजण्याचे काम प्रा. राजेंद्र पानसरे व युवराज काळे यांनी व निशाणाचे काम नवनाथ काळे यांनी पाहिले. यात्रेचे समालोचन साहेबराव आढळराव, माऊली पिंगळे, बाळासाहेब टेमगिरे आणि लक्ष्मण बांगर यांनी केले.
Latest Marathi News घोडेगावच्या हिंदकेसरी शर्यतीत धावले 365 बैलगाडे Brought to You By : Bharat Live News Media.
