पिंपरी : कष्टकर्‍यांच्या सामाजिक सुरक्षेसाठी संघर्ष करा : मेधा पाटकर

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : राज्यातील असंघटित कामगारांची संख्या मोठी आहे. मोठमोठ्या विकासात, इमारतीत ज्यांचे हात लागतात, असे श्रमिक हे राष्ट्र आणि राज्य निर्माण करतात. मात्र त्यांच्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. उतारवयामध्ये कष्टकरी, कामगारांना पेन्शनसह सामाजिक सुरक्षा मिळावी, यासाठी आजपासूनच संघर्ष करुन पेन्शन योजना हाती घ्या, असे आवाहन जनआंदोलनाच्या राष्ट्रीय नेत्या मेधा पाटकर यांनी सोमवारी … The post पिंपरी : कष्टकर्‍यांच्या सामाजिक सुरक्षेसाठी संघर्ष करा : मेधा पाटकर appeared first on पुढारी.

पिंपरी : कष्टकर्‍यांच्या सामाजिक सुरक्षेसाठी संघर्ष करा : मेधा पाटकर

पिंपरी : Bharat Live News Media वृत्तसेवा : राज्यातील असंघटित कामगारांची संख्या मोठी आहे. मोठमोठ्या विकासात, इमारतीत ज्यांचे हात लागतात, असे श्रमिक हे राष्ट्र आणि राज्य निर्माण करतात. मात्र त्यांच्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. उतारवयामध्ये कष्टकरी, कामगारांना पेन्शनसह सामाजिक सुरक्षा मिळावी, यासाठी आजपासूनच संघर्ष करुन पेन्शन योजना हाती घ्या, असे आवाहन जनआंदोलनाच्या राष्ट्रीय नेत्या मेधा पाटकर यांनी सोमवारी (दि. 1) केले.
कष्टकरी संघर्ष महासंघ, बांधकाम कामगार समिती, महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघातर्फे चिंचवड येथे असंघटित कष्टकरी पेन्शन परिषदेचे आयोजन केले होते. त्या प्रसंगी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कामगार नेते काशिनाथ नखाते होते. या वेळी राष्ट्रीय किमान वेतन आयोगाचे सदस्य चंदन कुमार, माजी नगरसेवक मारुती भापकर, राष्ट्रीय समन्वयक युवराज गटकळ, प्रसाद बागवे, महिला अध्यक्षा माधुरी जलमुलवार, वैशाली पाटील, संघटक अनिल बारावकर, निमंत्रक सिद्धनाथ देशमुख, इरफान चौधरी, राजू पठाण, मनोज यादव आदींसह असंघटित कामगार उपस्थित होते.
पाटकर म्हणाल्या, देशात रोजगाराच्या केवळ घोषणाच होतात. कोट्यवधी लोक न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. 44 कामगार कायदे मोडून किरकोळ श्रम संहिता केली आहे. याचा सरकारला जाब विचारायला हवा. आपण सत्याग्रही बनुन लढत राहायला हवे.
चंदन कुमार म्हणाले, राष्ट्रीय स्तरावर कामगारांच्या बाजूने अनेक पर्याय आहेत. मात्र सरकारची मानसिकता नाही. राजस्थान सरकारने कायदा केला त्याप्रमाणे महाराष्ट्रात देखील होणे गरजेचे आहे. अनेक ठिकाणी कामगारांचे मृत्यू होत आहेत. त्याबाबत उपाययोजना करायला हवी.
नखाते म्हणाले, तळवडे येथे 14 महिला, नागपूर येथील सालार कंपनीमध्ये 9 तर औरंगाबादमध्ये नववर्षाच्या पूर्वसंध्येला 6 असा महिनाभरात 29 कामगारांचा मृत्यू झाला आहे. त्याचे गांभीर्य सरकारला नाही. आयुष्यभर प्रचंड अंगमेहनतीची कामे करणार्या कष्टकरी कामगारांना पेन्शन चालू झाली पाहिजे. त्यासाठी आम्ही आग्रही राहणार आहोत. परिषदेचा ठराव राज्य व केंद्र शासनाकडे पाठवून त्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल. किरण साडेकर यांनी प्रास्ताविक केले. तर, संघटक अनिल बारवकर यांनी आभार मानले.
हेही वाचा

Pimpri News : नाशिक फाटा लूप वाहतुकीस खुला
खा. शरद पवार लढविणार बारामतीची खिंड !
मूल होत नसलेल्या महिलांना गर्भवती करा, १३ लाख कमवा! धक्कादायक प्रकरणाचा पर्दाफाश

Latest Marathi News पिंपरी : कष्टकर्‍यांच्या सामाजिक सुरक्षेसाठी संघर्ष करा : मेधा पाटकर Brought to You By : Bharat Live News Media.