Accident : मद्यपी कारचालकाची दुचाकीला धडक
पुणेः Bharat Live News Media वृत्तसेवा : नववर्षाच्या स्वागतानिमित्त पोलिसांनी ड्रंक अॅण्ड ड्राईव्ह मोहीम तसेच चेक पोस्ट ठेवले असतानाही काही ठिकाणी मद्याच्या नशेत वाहने चालवून अपघात होण्याच्या घटना घडल्या आहेत. शिवणे येथे झालेल्या अपघातात एका मद्यपी कारचालकाने दुचाकीस्वारास उडवल्याने दोघे जखमी झाले आहेत. याप्रकरणी उत्तमनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशाल अनिल जाधव (22, रा. शिवणे ) याने दिलेल्या फिर्यादीनुसार करण तारासिंग चव्हाण (23, रा. मानगाव, हवेली) याच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यामध्ये विशाल जाधव आणि त्याचा भाऊ जखमी झाला आहे. ही घटना 31 डिसेंबर रोजी रात्री साडेबारा वाजता शिवणे येथे घडली. याप्रकरणी उत्तमनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी भावासह दुचाकीवरून चालला होता. या वेळी आरोपी करण चव्हाण हा भरधाव कार घेऊन चालला होता. मद्याच्या नशेत असल्याने नियंत्रण सुटून तो दुचाकीला धडकला. यामध्ये दोघेही भाऊ जखमी झाले. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक अनुसे करत आहेत.
डंपरच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी
भरधाव डंपरच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना 31 डिसेंबर रोजी अकरा वाजता घडली. याप्रकरणी कोरेगाव पार्क पोलिसांनी डंपरचालक लक्ष्मण कनसाळे (42, रा. हडपसर) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अनिता ओव्हाळ (49, रा. ताडीवाला रस्ता) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांचा भाऊ दीपक वाघमारे (42) हा दुचाकीवरून जाताना डंपरच्या धडकेत जखमी झाला. या प्रकरणाचा तपास सहायक पोलिस फौजदार कांबळे करत आहेत.
हेही वाचा
राज्यात 35 लाख टन साखर उत्पादन
‘Bharat Live News Media’चे पुढारपण समाजहिताचेच; मुख्यमंत्र्यांचे गौरवोद्गार
Nashik News : पानेवाडी, नागापूरमधून इंधनपुरवठा ठप्प
Latest Marathi News Accident : मद्यपी कारचालकाची दुचाकीला धडक Brought to You By : Bharat Live News Media.