वर्षा उसगावकरचा ‘ओली की सुकी’ चित्रपट ओटीटीवर

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : प्रत्येक नवा दिवस आपल्यासोबत एक नवीन संधी घेऊन येतो, अशाच एका प्रेरणादायी विषयावर आधारित ‘ओली की सुकी’ चित्रपट येतोय. ४ जानेवारी २०२४ रोजी ‘अल्ट्रा झकास’ मराठी ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. (Tejashree Pradhan) चित्रपटाचे दिग्दर्शन ‘आनंद दिलीप गोखले’ यांनी केले आहे. चित्रपटात तेजश्री प्रधान, भार्गवी चिरमुले, शर्वरी लोहकरे, संजय खापरे, सुहास शिरसाट आणि वर्षा उसगांवकर हे प्रसिद्ध कलाकार दिसणार आहेत. (Tejashree Pradhan)
संबंधित बातम्या –
कलाकारही गिरवताहेत भाषांचे धडे
Samantha Ruth Prabhu :’अनेक देवदूत आपल्याला घेरतील’, सामंथाची ‘ती’ पोस्ट चर्चेत
दोन भिन्न नव्या मालिका ‘पारू’ आणि ‘शिवा’ लवकरच
चित्रपटाची कथा झोपडपट्टी आणि त्यातील आयुष्यात भरकटलेल्या मुलांभोवती फिरते. झोपडपट्टीतील टुकार मुलांच्या दोन गटांत नेहमी विनाकारण भांडणे होत राहतात. ही मुले वाईट वळणांच्या एवढ्या अधीन जातात की, चोरी करण्यापर्यंत यांचे विचार पोहोचतात. पण त्याचवेळी त्यांच्या आयुष्यात राधिकाताई येते, जी त्यांच्या संपूर्ण जीवनाला एक वेगळंच वळण देते. राधिकाताईने नेमकी अशी कोणती जादू या मुलांवर केली ते चित्रपटात पहायला मिळणार आहे.
Latest Marathi News वर्षा उसगावकरचा ‘ओली की सुकी’ चित्रपट ओटीटीवर Brought to You By : Bharat Live News Media.
