पुणे : परवाना नूतनीकरण न केलेल्या ‘स्टॉल्स’वर संक्रांत; अतिक्रमण विभागाची कारवाई

पुणे : पुढारी वृत्तसेवा : पथारी व्यवसायाच्या नवीन धोरणानुसार परवान्यांचे नूतनीकरण न करणार्‍या स्टॉल्सवर कारवाई करण्यात येत आहे. आतापर्यंत 80 हून अधिक स्टॉल्स सील करण्यात आले आहेत. पुणे शहरात महापालिकेच्यावतीने छोट्या व्यावसायिकांना स्टॉल्सचे परवाने दिले आहेत. या स्टॉलधारकांना पथारी व्यावसायाच्या नवीन धोरणानुसार परवाना घेणे आवश्यक आहे. परंतु, वेळोवेळी आवाहन केल्यानंतरही शहरातील सुमारे 600 स्टॉलधारकांनी परवान्यांचे … The post पुणे : परवाना नूतनीकरण न केलेल्या ‘स्टॉल्स’वर संक्रांत; अतिक्रमण विभागाची कारवाई appeared first on पुढारी.

पुणे : परवाना नूतनीकरण न केलेल्या ‘स्टॉल्स’वर संक्रांत; अतिक्रमण विभागाची कारवाई

पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : पथारी व्यवसायाच्या नवीन धोरणानुसार परवान्यांचे नूतनीकरण न करणार्‍या स्टॉल्सवर कारवाई करण्यात येत आहे. आतापर्यंत 80 हून अधिक स्टॉल्स सील करण्यात आले आहेत. पुणे शहरात महापालिकेच्यावतीने छोट्या व्यावसायिकांना स्टॉल्सचे परवाने दिले आहेत. या स्टॉलधारकांना पथारी व्यावसायाच्या नवीन धोरणानुसार परवाना घेणे आवश्यक आहे. परंतु, वेळोवेळी आवाहन केल्यानंतरही शहरातील सुमारे 600 स्टॉलधारकांनी परवान्यांचे नूतनीकरण केलेले नाही. या स्टॉलधारकांवर मागील शनिवारपासून कारवाई करण्यास सुरुवात करण्यात आली आहे.
आतापर्यंत 80 हून अधिक स्टॉल सील करण्यात आले आहेत. या व्यावसायिकांना मागील काही महिन्यांत नवीन धोरणानुसार परवाना घेण्याबाबत प्रस्ताव दाखल करण्याचे वेळोवेळी आवाहन करण्यात आले आहे. शहरातील पथारी व्यावसायिकांकडे नवीन धोरणानुसार मोठ्याप्रमाणावर सेवा शुल्कची थकबाकी आहे. कोरोनाची साथ संपून दोन वर्षे उलटली आहेत. परंतु, यानंतरही 45 कोटी रुपयांची थकबाकी आहे. थकबाकी दारांकडून सेवाशुल्क वसुलीसाठीही विशेष मोहीम सुरू करण्यात येत आहे. थकबाकीदारांनी तातडीने थकबाकी भरावी आणि कारवाई टाळावी, असे आवाहन अतिक्रमण विभागाचे प्रमुख माधव जगताप यांनी केले आहे.
हेही वाचा

पक्ष मजबुतीसाठी जनतेच्या प्रश्नांना भिडा : हसन मुश्रीफ
Pune : महावितरणची नवीन वीजजोडणी उपलब्ध होणार
Pune : नववर्षानिमित्त देवदर्शन अन् पर्यटन : पहिल्या दिवशी मंदिरांमध्ये गर्दी

Latest Marathi News पुणे : परवाना नूतनीकरण न केलेल्या ‘स्टॉल्स’वर संक्रांत; अतिक्रमण विभागाची कारवाई Brought to You By : Bharat Live News Media.