सातारा : स्नेहवर्धक सोहळ्यात ‘Bharat Live News Media’ वर शुभेच्छांचा वर्षाव
सातारा; Bharat Live News Media वृत्तसेवा : सातारा जिल्ह्यातील प्रथम क्रमांकाचे व सर्वाधिक खपाचे वृत्तपत्र असलेल्या दै. ‘Bharat Live News Media’चा 85 वा वर्धापनदिन सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत सोमवारी दणक्यात अन् थाटामाटात पार पडला. सुरांच्या मैफिलीत, फुलांच्या सुगंधाने भारावलेल्या सायंकाळी, मंतरलेल्या वातावरणात हॉटेल लेक व्ह्यूच्या संस्कृती लॉनवर झालेल्या रंगारंग स्नेहमेळाव्यात ‘Bharat Live News Media’वर हजारो वाचकांनी अभिनंदन, कौतुक व शुभेच्छांचा वर्षाव केला. या स्नेहमेळाव्याला यंदा रेकॉर्डब्रेक जनसागर लोटला. पहिल्याच दिवशी प्रसिद्ध केलेल्या 56 पानी जम्बो विशेषांकाचे वाचकांनी जोरदार स्वागत केले.
जिल्ह्याचे काळीज पान ठरलेल्या ‘Bharat Live News Media’ने सातारा जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडून अन्याय अत्याचाराविरोधात कठोर प्रहार करतच रहावे. खपाच्या बादशहाने सदैव जनता जनार्दनाच्या पाठीशी रहावे, अशी अपेक्षा व्यक्त करत उपस्थितांनी ‘Bharat Live News Media’कार पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव यांना विनम्र अभिवादन केले.
‘Bharat Live News Media’चा वर्धापनदिन स्नेहमेळावा म्हणजे आनंदाची पर्वणीच. विविध क्षेत्रातील स्नेहीजणांच्या भेटीचा योग जुळवून आणणारा आपल्या हक्काचा सोहळा, या भावनेतून जिल्हाभरातून विविध मान्यवरांनी या सोहळ्याला हॉटेल लेक व्ह्यूच्या संस्कृती लॉनवर आवर्जून उपस्थिती लावली. स्नेहीजणांची ताला-सुरांच्या गट्टीत आगळी-वेगळी मैफल रंगली. स्नेहमेळाव्यावेळी राजमाता श्री. छ. कल्पनाराजे भोसले व मान्यवरांनी पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव यांच्या प्रतिमेस अभिवादन केले. त्यानंतर विधान परिषदेचे माजी सभापती आ. रामराजे ना. निंबाळकर, आ. शिवेेंद्रराजे भोसले, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पोलिस अधीक्षक समीर शेख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, अतिरिक्त जिल्हाधिकारी जीवन गलांडे, माजी आमदार प्रभाकर घार्गे, डॉ. दिलीप येळगावकर, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे, सोलापूरच्या सामाजिक कार्यकर्त्या डॉ. श्रद्धा जवंजाळ यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून स्नेह मेळाव्याचे उद्घाटन झाले. यावेळी ‘Bharat Live News Media’ने प्रसिद्ध केलेल्या ‘यंग इंडिया’ या 56 पानी जंबो विशेषांक पुरवणीचेही मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
अत्यंत उत्साही व जल्लोषी वातावरणात झालेल्या या गौरव सोहळ्याच्या उद्घाटनप्रसंगी अॅड. विजय कणसे,
प्रदीप विधाते, डॉ. नितीन सावंत, राजेंद्र चोरगे, प्राचार्य यशवंत पाटणे, डॉ. अविनाश पोळ, जयसिंग चव्हाण, अॅड. वर्षा देशपांडे, सहाय्यक आयुक्त नितीन उबाळे, माजी नगराध्यक्षा सौ. रंजना रावत, धनश्री महाडिक यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. त्यानंतर ‘Bharat Live News Media’ परिवाराला शुभेच्छा देण्यासाठी मान्यवरांची रीघ लागली. रात्री उशिरापर्यंत राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, साहित्य, शैक्षणिक, प्रशासकीय, औद्योगिक क्षेत्रासह वाचक, जाहिरातदार, विक्रेते, एजंट, हितचिंतक व विविध क्षेत्रातील मान्यवर हजेरी लावत होते. या मान्यवरांचे स्वागत दै. ‘Bharat Live News Media’चे विभागीय व्यवस्थापक जीवनधर चव्हाण, वृत्तसंपादक हरीष पाटणे, जाहिरात विभाग प्रमुख मिलींद भेडसगावकर यांच्यासह ‘Bharat Live News Media’ परिवाराने केले.
मान्यवरांसह विविध स्तरातील समाजघटकांनी ‘Bharat Live News Media’कारांना अभिवादन केले. सायंकाळ वाढत गेली तसा कार्यक्रमातील जोश व उल्हास वाढत गेला. संगीत सुरांच्या सुरेल मैफलीत राजकारणाच्या रहाटगाडग्यातून निवांत क्षणांची अपेक्षा करणार्या राजकारण्यांनाही विरंगुळा मिळाला. अनेक मान्यवरांनी उशिरापर्यंत थांबून कार्यक्रमाचा आस्वाद घेतला. ‘Bharat Live News Media’ वर्धापनदिन सोहळ्याच्या निमित्ताने हे सारे समाजघटक काही तास एकत्र रमले, राग लोभ विसरून शेजारी शेजारी बसले, दिलखुलास गप्पा झाल्या. अधून मधून राजकीय टोलेबाजी झाली व सरतेशेवटी जाताना आमच्यावर लक्ष राहू द्या, अशी प्रेमाची विनंतीही झाली. त्यात ‘Bharat Live News Media’विषयीचा आदरभाव, निर्भिड पत्रकारीतेविषयी असलेला विश्वास, पारदर्शकता, संवेदनशिलतेविषयी असलेली ओढ व सातारा जिल्ह्यातील जनतेच्या कल्याणाविषयी असलेली आस्था दिसून आली.
दै. ‘Bharat Live News Media’ कार्यालयात उत्साह अन् जल्लोषाची धूूम
वर्धापनदिनामुळे दै. ‘Bharat Live News Media’च्या सातारा कार्यालयात दिवसभर उत्साह अन् जल्लोषाची धूूम होती. विविध रंगी रांगोळ्या व आकर्षक सजावट यामुळे कार्यालयाचा लूक पालटून गेला होता. संपूर्ण कार्यालयात डोळे दिपवणार्या विद्युत रोषणाईचे तेज चमकत होते. पताकांच्या झगमगाटाने कार्यालय नटले होते. कार्यालयाचा हा रुबाब भूलवून जात होता. कार्यालयात प्रवेश केल्यानंतर दर्शनी भागात असलेली पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव यांची प्रतिमा आकर्षक फुलांनी सजवण्यात आली होती. येणारा प्रत्येकजण ‘Bharat Live News Media’कारांना नम्र व आदरपूर्वक अभिवादन करत होता. वर्धापनदिनामुळे संपूर्ण कार्यालयात चंदेरी, सोनेरी तेजाची दुनियाच अवतरली होती.
‘Bharat Live News Media’का जवाब नही’; वाचकांच्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया
वृत्तपत्र क्षेत्रात वर्धापनदिनानिमित्त लक्षवेधी पुरवण्या काढण्याचा विक्रम दरवर्षी ‘Bharat Live News Media’ करत असतो. यंदा तर हा आलेख आणखी वाढला. ‘यंग इंडिया’ या दणकेबाज उच्चांकी विशेषांक मालिकेचे कोंदण लाभले. सलग 15 दिवस प्रसिद्ध होणार्या या विशेषांक मालिकेतील पहिल्याच दिवशी 56 पानी जम्बो पुरवणी सोमवारी प्रसिद्ध झाली. त्याचे जिल्हाभरातील वाचकांनी जोरदार स्वागत केले. अनेक वाचकांनी ‘Bharat Live News Media’कडे याबाबत उत्स्फूर्त प्रतिक्रिया देत ‘Bharat Live News Media’का जवाब नही’ अशी भावना व्यक्त केली. विशेषांक मालिकांमधील पुरवण्यांमध्ये विविध विषयांतील तज्ज्ञ व अभ्यासकांच्या माहितीपूर्ण लेखांसह जिल्ह्याची वैशिष्ट्ये, समृद्ध वारसा, तरुणाईचा बदलता ट्रेंड आदी संग्राह्य व परिपूर्ण माहिती अन् लेखांचा खजाना वाचकांना मिळणार आहे.
Latest Marathi News सातारा : स्नेहवर्धक सोहळ्यात ‘Bharat Live News Media’ वर शुभेच्छांचा वर्षाव Brought to You By : Bharat Live News Media.