डॉ. प्रतापसिंह जाधव यांची उद्या ‘चॅनेल बी’वर खास मुलाखत
कोल्हापूर, Bharat Live News Media वृत्तसेवा : वाचकांच्या मनावर गेली 85 वर्षे अधिराज्य गाजवणार्या दैनिक ‘Bharat Live News Media’चा वर्धापन दिन 1 जानेवारी रोजी साजरा झाला. यानिमित्त पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे केबल नेटवर्क असणार्या ‘चॅनेल बी’च्या वतीने दै. ‘Bharat Live News Media’चे संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांची घेण्यात आलेली विशेष मुलाखत बुधवारी (दि. 3) प्रसारित करण्यात येणार आहे. (Dr. Pratapsinh Jadhav)
डॉ. जाधव यांनी दै. ‘Bharat Live News Media’च्या प्रवासाबद्दल दिलखुलास अशी मतं व्यक्त केली आहेत. ‘Bharat Live News Media’ची वाटचाल कशा पद्धतीने झाली, सर्वात भावलेला नेता हे सांगताना त्यांनी राजकीय नेत्यांसोबतच्या आठवणींना उजाळा दिला आहे. ‘प्रसार माध्यमांसमोरील आव्हाने’ यावरही आपले परखड मत व्यक्त केले आहे. ही मुलाखत ‘चॅनेल बी’चे व्यवस्थापकीय संचालक पृथ्वीराज महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली. मुलाखतीची निर्मिती व्यवस्था ‘चॅनेल बी’चे प्रोग्रामिंग हेड सागर चौगले यांनी पाहिली. बी न्यूजचे कार्यकारी संपादक ताज मुल्लाणी यांनी मुलाखत घेतली.
ही मुलाखत चॅनेल बी, क्रमांक 532 वर बुधवार, दि. 3 रोजी संध्याकाळी 6 वाजता व गुरुवार, दि. 4 रोजी दुपारी 12.30 वाजता प्रसारित होणार आहे.
Latest Marathi News डॉ. प्रतापसिंह जाधव यांची उद्या ‘चॅनेल बी’वर खास मुलाखत Brought to You By : Bharat Live News Media.