सोलापूर : पाकणी येथील इंधन टँकर चालक, मालकांचा कडकडीत बंद

बेलभंडारे पाकणी: पुढारी वृत्तसेवा : केंद्र सरकारच्या नवीन वाहतूक धोरणाविरोधात पाकणी येथील इंडियन ऑइल कार्पोरेशन लि. आणि भारत पेट्रोलियम कार्पोरेशन लि. येथील सर्व टँकर चालक, मालकांनी आज (दि.१) बंद पाळून आंदोलन केले. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी आंदोलन केल्याने इंधनाची टंचाई भासण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारच्या नवीन वाहतूक धोरणात वाहन चालकाकडून अपघात झाल्यास आणि तो पळून … The post सोलापूर : पाकणी येथील इंधन टँकर चालक, मालकांचा कडकडीत बंद appeared first on पुढारी.

सोलापूर : पाकणी येथील इंधन टँकर चालक, मालकांचा कडकडीत बंद

बेलभंडारे पाकणी: Bharat Live News Media वृत्तसेवा : केंद्र सरकारच्या नवीन वाहतूक धोरणाविरोधात पाकणी येथील इंडियन ऑइल कार्पोरेशन लि. आणि भारत पेट्रोलियम कार्पोरेशन लि. येथील सर्व टँकर चालक, मालकांनी आज (दि.१) बंद पाळून आंदोलन केले. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी आंदोलन केल्याने इंधनाची टंचाई भासण्याची शक्यता आहे.
केंद्र सरकारच्या नवीन वाहतूक धोरणात वाहन चालकाकडून अपघात झाल्यास आणि तो पळून गेल्यास ७ लाख दंड व १० वर्षे शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. तर अपघात झालेल्या व्यक्तीला अपघात करणा-या वाहन चालक, क्लिनिअर यांनी रूग्णालयामध्ये दाखल केल्यास दंड आणि शिक्षा कमी होऊ शकते. हा नियम जाचक असल्याने टँकर चालक, मालकांनी नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी कडकडीत बंद पाळून निषेध केला.
या बंद आंदोलनामुळे पाकणी ऑईल डेपोमधून सोलापूरसह इंधन पुरवठा होणा-या उस्मानाबाद, लातूर, बीड, नांदेड, जत आदी ठिकाणी इंधन पुरवठा झाला. त्यामुळे येथे इंधन टंचाई भासण्याची शक्यता आहे.
हेही वाचा 

सोलापुरात : लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाडाच्या गाडीचा अपघात, एक महिला ठार तर १४ जखमी; करमाळा-राशीन मार्गावरील घटना
सोलापूर महामार्गाचे नवीन वर्षात लोकार्पण : खासदार सुजय विखे
सोलापूर: उडगीत सिद्धाराम म्हेत्रे यांच्या बॅनरची विटंबना; काँग्रेस कार्यकर्त्यांचा रास्ता रोको

Latest Marathi News सोलापूर : पाकणी येथील इंधन टँकर चालक, मालकांचा कडकडीत बंद Brought to You By : Bharat Live News Media.