माणिकराव भडंगे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

बारामती : पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रीय होलार समाज संघाचे संस्थापक अध्यक्ष माणिकराव भडंगे यांनी संघाच्या कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अजित पवार गट) नुकताच प्रवेश केला. उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी भडंगे यांचे पक्षात स्वागत करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. राष्ट्रीय होलार समाज संघाच्या माध्यमातून भडंगे यांचे … The post माणिकराव भडंगे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश appeared first on पुढारी.

माणिकराव भडंगे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

बारामती : Bharat Live News Media वृत्तसेवा : राष्ट्रीय होलार समाज संघाचे संस्थापक अध्यक्ष माणिकराव भडंगे यांनी संघाच्या कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अजित पवार गट) नुकताच प्रवेश केला. उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी भडंगे यांचे पक्षात स्वागत करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. राष्ट्रीय होलार समाज संघाच्या माध्यमातून भडंगे यांचे राज्यभर काम आहे. त्यांच्या प्रवेशाने पक्षाला निश्चित बळ मिळेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री पवार यांनी व्यक्त केला. भडंगे यांच्यावर योग्य ती जबाबदारी दिली जाईल, अशी ग्वाही खासदार तटकरे यांनी दिली.
या वेळी प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, उत्तम होतेकर, प्रकाश जावीर, नामदेव ऐवळे, प्रमिला भडंगे, भालेराव पारसे, विशाल भडंगे, श्रीधर भडंगे, सामाजिक कार्यकर्ते गोरख पारसे, बंडू अहिवळे, नारायण ढोबळे, शेखर अहिवेळे आदींची उपस्थिती होती. भडंगे यांनी समाजाच्या अडीअडचणी मांडल्या. पक्षाच्या माध्यमातून त्या सोडविण्यासाठी ताकद द्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. ठाण्यामध्ये लवकरच संघाचा मेळावा आयोजित केला जाणार असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री पवार यांची त्या वेळी उपस्थिती असेल, असे भडंगे यांनी सांगितले.
 
Latest Marathi News माणिकराव भडंगे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश Brought to You By : Bharat Live News Media.