गोवा: नववर्षाच्या पहिल्याच दिवशी तिघांचा अपघाती मृत्यू

पणजी : नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या रस्ता अपघातात तिघांचा मृत्यू झाला. नव्या वर्षातील पहिला दिवस त्यांच्यासाठी अखेरचा ठरला. मळा – पणजी येथील पॉप्युलर स्कूलसमोर खोदलेल्या खड्ड्यात दुचाकी जाऊन माजी नगरसेवक रुपेश हळर्णकर यांचा मुलगा आयुष हळर्णकर याचा सोमवारी पहाटे मृत्यू झाला. कंत्राटदारांच्या भोंगळ कामांमुळेच २१ वर्षीय आयुषचा बळी गेल्याचा दावा स्थानिकांकडून केला … The post गोवा: नववर्षाच्या पहिल्याच दिवशी तिघांचा अपघाती मृत्यू appeared first on पुढारी.

गोवा: नववर्षाच्या पहिल्याच दिवशी तिघांचा अपघाती मृत्यू

प्रभाकर धुरी

पणजी : नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या रस्ता अपघातात तिघांचा मृत्यू झाला. नव्या वर्षातील पहिला दिवस त्यांच्यासाठी अखेरचा ठरला. मळा – पणजी येथील पॉप्युलर स्कूलसमोर खोदलेल्या खड्ड्यात दुचाकी जाऊन माजी नगरसेवक रुपेश हळर्णकर यांचा मुलगा आयुष हळर्णकर याचा सोमवारी पहाटे मृत्यू झाला. कंत्राटदारांच्या भोंगळ कामांमुळेच २१ वर्षीय आयुषचा बळी गेल्याचा दावा स्थानिकांकडून केला जात आहे.
वाळपई येथील अपघातात पोलिसाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आलेली आहे. उल्हास गावकर (३२, डोंगुर्ली-ठाणे) असे मृत झालेल्या पोलिसाचे नाव आहे. उल्हास गावकर फोंडा पोलिस स्थानकात कार्यरत होते. सोमवारी सकाळी ड्युटीवर जाण्यासाठी ते दुचाकीवरून  बाहेर पडले असता वाळपई येथील हनुमान मंदिराजवळ कार आणि त्यांच्या दुचाकीचा अपघात झाला. यात उल्हास गावकर य‍ांचा मृत्यू झाला.
तिसरी घटना भोम येथे घडली. मुस्लिमवाडा – भोम येथे रात्री स्कुटरची वीज खांबाला धडक बसून झालेल्या अपघातात प्रतिम रोमन बोरा (वय ३१, रा. मुस्लिमवाडा, मूळ आसाम) याचा त्याच्या वाढदिवशीच मृत्यू झाला.
हेही वाचा 

गोवा : धर्मांतरण प्रकरणी चर्चच्या कथित धर्मगुरूंना अटक
गोवा : सांगेच्या नगरसेवकास एक कोटीचा दंड
गोवा : सुमारे 87 टक्के गोमंतकीय मासे खाणारे

Latest Marathi News गोवा: नववर्षाच्या पहिल्याच दिवशी तिघांचा अपघाती मृत्यू Brought to You By : Bharat Live News Media.