चौफुला येथे विवाहितेचा संशयास्पद मृत्यू

केडगाव : Bharat Live News Media वृत्तसेवा : चौफुला परिसरातील इंदिरानगर येथे एका विवाहितेचा संशयास्पदस्थितीत मृतदेह आढळून आला. या विवाहितेचा खून करण्यात आला आहे, अशी चर्चा परिसरात असून, पोलिस मात्र याबाबत माहिती देण्यास टाळाटाळ करीत आहेत. सारिका ज्ञानेश्वर भालेराव असे मृत महिलेचे नाव असून, ही घटना शनिवारी (दि. 30) मध्यरात्री तिच्या राहत्या घरी घडली. केडगाव पोलिसांकडून याबाबत माहिती मिळालेली माहिती अशी की, चौफुला परिसरातील इंदिरानगरमध्ये भालेराव कुटुंब मागील 15 वर्षांपासून राहत आहेत. मयत सारिका यांना पाच मुली आहेत.
त्यातील दोन मुलींना शिक्षणासाठी बोर्डिंग स्कूलमध्ये त्यांनी टाकले आहे. त्यामुळे सध्या त्या दोन मुलींसह राहत होत्या. त्यापूर्वी त्या आजेसासू तुळसाबाई आणि त्यांचा नातू ज्ञानेश्वर यांच्यासह राहत होत्या. दरम्यान, शनिवारी मध्यरात्री त्यांचा मृत्यू झाला. ही माहिती पोलिसांना रविवारी (दि. 31) पहाटे कळली. पोलिसांनी तातडीने तेथे जात मयत सारिका यांचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविला. याबाबत केडगावचे सहायक पोलिस निरीक्षक संदेश बावसकर यांनी सध्या याप्रकरणी गुन्हा दाखल केला नाही, असे सांगून माहिती देण्यास टाळाटाळ केली.
Latest Marathi News चौफुला येथे विवाहितेचा संशयास्पद मृत्यू Brought to You By : Bharat Live News Media.
