Crime News : भावाच्या छळाला कंटाळून बहिणीची आत्महत्या

पिंपरी : भावाला दिलेले पैसे मागितल्याने भावाने आणि त्याच्या पत्नीने बहिणीचा शारीरिक आणि मानसिक छळ केला. या छळाला कंटाळून बहिणीने विषारी औषध प्राशन करत आत्महत्या केली. हा धक्कादायक प्रकार 6 डिसेंबर रोजी घडला असून याप्रकरणी 30 डिसेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुनीता उर्फ नीता रामेश्वर राठोड (31, रा. ताथवडे) असे आत्महत्या केलेल्या बहिणीचे … The post Crime News : भावाच्या छळाला कंटाळून बहिणीची आत्महत्या appeared first on पुढारी.

Crime News : भावाच्या छळाला कंटाळून बहिणीची आत्महत्या

पिंपरी : भावाला दिलेले पैसे मागितल्याने भावाने आणि त्याच्या पत्नीने बहिणीचा शारीरिक आणि मानसिक छळ केला. या छळाला कंटाळून बहिणीने विषारी औषध प्राशन करत आत्महत्या केली. हा धक्कादायक प्रकार 6 डिसेंबर रोजी घडला असून याप्रकरणी 30 डिसेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुनीता उर्फ नीता रामेश्वर राठोड (31, रा. ताथवडे) असे आत्महत्या केलेल्या बहिणीचे नाव आहे. याप्रकरणी सुनीता यांचे पती रामेश्वर राठोड यांनी वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यानुसार, सुनीता यांचा भाऊ संदीप शामराव चव्हाण आणि त्याच्या पत्नी (दोघे रा. ताथवडे) विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.फिर्यादी रामेश्वर आणि सुनीता यांना दोन मुले आहेत. दोघेही मजुरीचे काम करत होते. सुनीता यांनी भाऊ संदीप याला दोन लाख रुपये उसने दिले होते. ते परत मागण्यासाठी 3 डिसेंबर रोजी त्या भावाच्या घरी गेल्या होत्या. तिथे भावाच्या पत्नीने सुनीता यांना शिवीगाळ करून घरातून हाकलून दिले. त्यानंतर त्याच दिवशी रात्री उशिरा रामेश्वर यांच्या घरी येऊन संदीप याच्या पत्नीने सुनीता यांना मारहाण केली. 4 डिसेंबर रोजी याबाबत त्यांनी वाकड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
5 डिसेंबर रोजी सुनीता एका सोसायटीमध्ये घर काम करण्यासाठी गेल्या होत्या. काम करून घरी परत येत असताना त्यांना भाऊ संदीप आणि त्याच्या पत्नीने अडवले. पोलिसात तक्रार केल्याच्या कारणावरून केली. तसेच जीवे मारण्याची देखील धमकी दिली. याबाबत पुन्हा वाकड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. दरम्यान, 6 डिसेंबर रोजी सुनीता सकाळी सहा वाजता कामावर जाते असे सांगून घराबाहेर पडल्या. सकाळी दहा वाजता त्या ताथवडे येथे बेशुद्ध अवस्थेत त्यांच्या नातेवाइकांना दिसल्या. त्यांना तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरु असताना 10 डिसेंबर रोजी मध्यरात्री त्यांचा मृत्यू झाला.
हेही वाचा 

महाराष्ट्रात १ कोटी विकसित भारत अँबेसेडर बनवण्याचे लक्ष्य : कुलजीत सिंग चहल
शंभराव्या नाट्यसंमेलन समारोपाचा मान तळेगावास
Market Update : लिंबू झाले स्वस्त सीताफळ, खरबूज महाग

 
Latest Marathi News Crime News : भावाच्या छळाला कंटाळून बहिणीची आत्महत्या Brought to You By : Bharat Live News Media.