‘हुथी’वर अमेरिकेची कारवाई; लाल समुद्रात ३ जहाजांवर हल्‍ला, १० बंडखोर ठार

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : अमेरिकेने लाल समुद्रात पुन्हा एकदा हुथी बंडखोरांवर (Houthi rebels)  कारवाई केली आहे. अमेरिकन नौदलाने लाल समुद्रातील एका व्यापारी जहाजावर हुथी बंडखोरांनी केलेला हल्ला हाणून पाडला. बंडखोरांच्‍या तीन जहाजांवर अमेरिकेने केलेल्‍या हल्‍ल्‍यात १० बंडखाेर ठार झाले आहेत. लाल समुद्रात जहाजांच्या हालचालींवर ४८ तासांसाठी बंदी अमेरिकेच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, हुथी बंडखोरांच्या हल्ल्यानंतर लाल … The post ‘हुथी’वर अमेरिकेची कारवाई; लाल समुद्रात ३ जहाजांवर हल्‍ला, १० बंडखोर ठार appeared first on पुढारी.
‘हुथी’वर अमेरिकेची कारवाई; लाल समुद्रात ३ जहाजांवर हल्‍ला, १० बंडखोर ठार

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्‍क : अमेरिकेने लाल समुद्रात पुन्हा एकदा हुथी बंडखोरांवर (Houthi rebels)  कारवाई केली आहे. अमेरिकन नौदलाने लाल समुद्रातील एका व्यापारी जहाजावर हुथी बंडखोरांनी केलेला हल्ला हाणून पाडला. बंडखोरांच्‍या तीन जहाजांवर अमेरिकेने केलेल्‍या हल्‍ल्‍यात १० बंडखाेर ठार झाले आहेत.
लाल समुद्रात जहाजांच्या हालचालींवर ४८ तासांसाठी बंदी
अमेरिकेच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, हुथी बंडखोरांच्या हल्ल्यानंतर लाल समुद्रातील सर्व जहाजांवर ४८ तासांसाठी बंदी घालण्यात आली आहे. हुथी बंडखोरांच्या प्रवक्त्याने सांगितले की, “जहाजांच्या क्रूने चेतावणी कॉलकडे लक्ष देण्यास नकार दिल्याने हा हल्ला झाला. लाल समुद्रात अमेरिकन सैन्याने  तीन जहाजांवर केलेल्‍या हल्‍ल्‍यात 10 हुथींचा मृत्‍यू झाला किंवा ते बेपत्ता आहेत.”
हमासला पाठिंबा दर्शवण्यासाठी हुथी बंडखोरांचा धिंगाणा
७ ऑक्‍टोबर २०२३ रोजी इस्रायलवर हमासने हल्‍ला केला. इस्‍त्रायलचे 1,200 नागरिक ठार झाले. तसेच 240 ओलिस घेतले. या हल्‍ल्‍यास इस्‍त्रायलने जोरदार प्रत्‍युत्तर दिले. यामध्‍ये 21,800 हून अधिक लोक मारले गेले आहेत, असे गाझा आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले. हमासला पाठिंबा दर्शवण्यासाठी येमेनचे हुथी बंडखोर नोव्हेंबरपासून लाल समुद्रातील जहाजांना लक्ष्य करत आहेत, मोठ्या शिपिंग कंपन्यांना सुएझ कालव्याच्या ऐवजी आफ्रिकेच्या केप ऑफ गुड होपच्या आसपास लांब आणि महाग मार्ग घेण्यास प्रवृत्त करत आहेत. जगातील सर्वोच्च मालवाहतूक करणाऱ्यांपैकी एक असलेल्या मार्स्कने 24 डिसेंबर रोजी लाल समुद्रातून प्रवास पुन्हा सुरू होईल, असे सांगितले होते.
हेही वाचा : 

Drone Attack: लाल समुद्रात आणखी एका जहाजावर हुथी बंडखोराकडून ड्रोन हल्ला
Yemen’s Houthi rebels hijack cargo ship | लाल समुद्रात जहाज अपहरणाचा थरार! हुथी बंडखोरांकडून व्हिडिओ जारी

 
 
 
 
 
The post ‘हुथी’वर अमेरिकेची कारवाई; लाल समुद्रात ३ जहाजांवर हल्‍ला, १० बंडखोर ठार appeared first on Bharat Live News Media.