कोंढव्यातील दफनभूमीचा प्रस्ताव पालिकेकडून रद्द

कोंढवा : Bharat Live News Media वृत्तसेवा : कोंढवा खुर्द येथे क्रीडांगणाच्या जागेत मुस्लिम दफनभूमीचे काम करण्यात येत होते. मात्र, लोकांच्या तक्रारीवरून शिवसेना शहरप्रमुख (शिंदे गट) प्रमोद भानगिरे यांनी तातडीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांची भेट घेऊन दफनभूमीचा प्रस्ताव रद्द केला आहे. यामुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त होत आहे. कोंढवा खुर्द येथील सर्वे क्र. 44 मधील क्रीडांगणाच्या जागी मुस्लिम दफनभूमीचा प्रस्ताव प्रशासनाने मंजूर केला होता. यास स्थानिक नागरिकांनी विरोध करीत हा प्रस्ताव रद्द करण्याची मागणी त्यांनी भानगिरे यांच्याकडे केली होती. त्यानुसार भानगिरे यांनी महापालिका आयुक्तांशी हा प्रस्ताव रद्द करण्यासंदर्भात करण्याबाबत चर्चा केली.
तसेच मुख्यमंत्र्यांची मुंबई येथे भेट घेऊन हा प्रस्ताव रद्द करण्याबाबत महापालिकेला निर्देश देण्याची विनंती केली होती. त्यानंतर महापालिकेने अखेर दफनभूमीचा प्रस्ताव रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. भानगिरे म्हणाले, ’शिवसेना सदैव येथील स्थानिक नागरिकांच्या पाठीशी उभी आहे. यामुळे हा प्रस्ताव रद्द करण्याची मागणी मुख्यमंत्री आणि महापालिका आयुक्तांकडे केली होती.’ दरम्यान, हा प्रस्ताव रद्द करण्यात आल्याने जितो सोसायटी, रविराज कॉलरडो, कुमार पृथ्वी, ईशा पर्ल सोसायटी, वर्धमान सोसायटी, काकडे वस्ती, ज्ञानेश्वरनगर परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून, भानगिरे आणि मिलिंद एकबोटे यांचे आभार मानले.
Latest Marathi News कोंढव्यातील दफनभूमीचा प्रस्ताव पालिकेकडून रद्द Brought to You By : Bharat Live News Media.
