Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क: भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी आज (दि.०१) XPoSat चे प्रक्षेपण केले. PSLV-C58 रॉकेटच्या माध्यमातून ‘एक्स-रे पोलारिमीटर उपग्रह’चे श्रीहरीकोटा येथून यशस्वी प्रक्षेपण झाले. यानंतर माध्यमांशी संवाद साधताना ‘इस्रो’चे अध्यक्ष डॉ. एस. सोमनाथ यांनी नूतन वर्षातील माेहिमेची माहिती दिली. (ISRO Chairman S Somnath)
डॉ. एस. सोमनाथ म्हणाले की, 2024 हे वर्ष गगनयान तयारीसाठी असणार आहे. संपूर्ण वर्षच ‘गगनयान वर्ष’ असणार आहे. त्यासोबतच पॅराशूट सिस्टीम सिद्ध करण्यासाठी यंदाच्या वर्षात हेलिकॉप्टर-आधारित ड्रॉप टेस्ट देखील करण्यात येणार आहेत. यामध्ये मोठ्या प्रमाणात ड्रॉप टेस्ट करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. (ISRO Chairman S Somnath)
अवकाश संशोधनासाठी महत्त्वाचे वर्ष
यंदाचे वर्ष हे अवकाश संशोधनासाठी महत्त्वाचे वर्ष अरणार आहेत. या वर्षात शेकडो मूल्यांकन चाचण्या आखण्यात आल्या आहेत. त्यासोबतच GSLV चे देखील प्रक्षेपण करण्यात येणार असल्याचे डॉ. एस. सोमनाथ यांनी सांगितले. ISRO ने आज (दि.१) कृष्णविवरांसारख्या खगोलीय घटकांबद्दल सखोल अभ्यास करण्यासाठी सेट केलेल्या क्ष-किरण पोलारिमीटर उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले. (ISRO Chairman S Somnath)
#WATCH | ISRO Chairman S Somnath says “2024 is going to be the year for Gaganyaan readiness…Along with that, we will have a helicopter-based drop test to prove the Parachute systems, there will be multiple drop tests. We also will have many hundreds of valuation tests. So it is… pic.twitter.com/T3VAqloXng
— ANI (@ANI) January 1, 2024
हेही वाचा:
ISRO Review in Year 2023 : चांद्रयान ३, गगनयान, आदित्य एल १ – इस्रोची ऐतिहासिक कामगिरी
Mission Gaganyaan TV-D1 Test Flight | गगन चले हम! ISRO ची गगनयान प्रक्षेपण चाचणी यशस्वी
PM Modi on Isro: PM मोदींकडून अंतराळ मोहिमांसंदर्भात महत्त्वाच्या घोषणा; २०४० पर्यंत चंद्रावर मानव पाठवणार!
Latest Marathi News २०२४ असणार ‘गगनयान’ वर्ष : इस्रोचे अध्यक्ष डॉ. एस. सोमनाथ Brought to You By : Bharat Live News Media.